अधिकारी पदाचा फायदा उचलून कुरेशी समाजाला त्रास देणाऱ्या शिवशंकर स्वामी विरोधात कुरेशी समाजाचे बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन .. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 4, 2021

अधिकारी पदाचा फायदा उचलून कुरेशी समाजाला त्रास देणाऱ्या शिवशंकर स्वामी विरोधात कुरेशी समाजाचे बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन ..

अधिकारी पदाचा फायदा उचलून कुरेशी समाजाला त्रास देणाऱ्या शिवशंकर स्वामी विरोधात कुरेशी समाजाचे बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन ..                        बारामती:- मानद पशुकल्याण अधिकारी तथा भारत कृषी गोसेवा सभासद श्री. शिवशंकर राजेंद्र स्वामी हे महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी जावून जबरीने व शासनमान्य बळाचा दुरूपयोग करून
समाजात भय, भिती व दहशत तथा समाजात जातीवाचक तेढ निर्माण करत असल्याबाबत तकार अर्ज बारामती शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्याकडे बारामती मधील कुरेशी समाज बांधवांच्या वतीने सह्याचे निवेदन देण्यात आले या निवेदनात मानद पशुकल्याण अधिकारी तथा भारत कृषी गोसेवा संघाचे सभासद श्री.शिवशंकर राजेंद्र स्वामी, रा. रेवेन्यू अपार्टमेंट, शिवाजीनगर, पुणे हे आपल्या अधिकारी पदाचा फायदा उचलून संपूर्ण बारामती तालुका तथा महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी जावून गौमांस तस्कर करणाऱ्या विरूध्द माहिती गोळा करतात व त्यानंतर त्या परीसरातील तरूण पिढी तथा गुंड प्रवृत्ती लोकांचा जमाव तथा टोळी बनवितात व त्यांना गौमांस तस्करीची खबर मिळाल्यास पोलिसांना खबर देण्याऐविजी स्वतः त्या ठिकाणी आपल्या टोळीला घेवून पोहचतात व त्या ठिकाणावरील लोकांना शिवीगाळ करून मारहाण करतात व त्यानंतर सर्वात शेवटी पोलिसांना फोन करून कारवाही करण्यास लावतात व जर एखादी व्यक्ती त्यांचा सदर घटनेच्या वेळी त्यांचा तिरस्कार करत असेल तर पोलिसांना खोटी माहिती देवून त्यांचेवर खोटे गुन्हे दाखल करण्यास भाग पडतात, त्यांच्या अशा सर्व कृत्यांमुळे परिसरातील तथा समाजातील लोकांमध्ये भय, भिती तथा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यांच्या दहशतीमुळे सर्व सामान्य माणूस त्यांचे विरोधात तक्रार देण्यास व सामोरे जाण्यास देखील घाबरतात.त्यामुळे त्यांच्या विरोधात देखील कोणीही तक्रार देत नाही.शिवशंकर राजेंद्र स्वामी यांचेवर आजतागायत भा.द.वि. कलम ३०७, ३९५,३२५, १४१, १४३, १४९, ३२३ तथा महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम१३५ सारख्या अनेक कलमा अंतर्गत अनेक गुन्हे दाखल असून लोणी काळभोर, खडकी, दत्तवाडी, विश्वांतवाडी, पुणे शहर, आळाफाटा इ. ठीकाणी दाखल असून देखील शासनाने त्याना बलशाली पदाचे पर्दापण केलेले आहे व हीच व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीवर तीन अथवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असेल तर शासनाकडे त्यांचेवर मोका अंतर्गत कारवाही करण्याची मागणी करते त्यांना हददपार करण्याची ठराव मांडतात मग अशा परिस्थितीत कायदा फक्त सर्व सामान्य जनतेसाठीच आहे काय ? अशा अधिकाऱ्यांना की जे सराईत गुन्हेगार असून देखिल त्यांचीच साथ देणे हा सर्व-सामान्य जनतेवर अन्याय नाही का? हा प्रश्न आता आम्हा सर्वाच्या मनात उद्भवला आहे, सध्या परिस्थिती अशा अधिकाच्यांमुळे समाजात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होवून हिंदू मुस्लिम दंगलीचे वातावरण निर्माण होवुन धोका उत्पन्न झालेला
आहे. बारामती शहरात भय-भिती तथा दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.आणि अशा अधिकाऱ्याचा समाजाला इतपत त्रास असून सुध्दा असे अधिकारी मानद पशुकल्याण अधिकारी या पदासाठी योग्य आहेत का? यामुळे सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत हुक्काचा अधिकार नष्ट होत नाही का? असा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे आणि अशा परिस्थितीत शिवशंकर स्वामी यांना शासनाचे मिळणारे सहकार्य हे सर्व सामान्य जनतेवर अन्याय कारक नाही का ? शिवशंकर स्वामी यांना अशा बेकायदेशीर कृत्यांना कोठेतरी अडथळा घालणे
अत्यंत आवश्यक झालेले आहे व त्यांच्या अशा महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी जावून जबरीचा तथा शासनमान्य बलाचा दुरूपयोग करून सर्व सामान्य जनतेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणे व समाजात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण होईल असे वेगवेगळे पोस्ट फेसबुक, इन्स्टाग्राम, वॉटसोंप इ. सोशल मिडिया
प्रोग्रामद्वारे जगभरात पसरून संपूर्ण देशात जातीवादाचे वातावरण निर्माण करणे देखील बंद करणे अत्यंत आवश्यक झालेले आहे व त्यासाठी त्यांचेवर योग्य ते कड़क शासन करून त्यांचेवर योग्य त्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य त्यारित्या प्रतिबंधक कारवाई करणे व या सर्व प्रकाराला आळा घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे.तरी आपणांस नम्र विनंती की, शिवशंकर स्वामी व त्यांची टोळी यांचेवर,
समाजात तेढ निर्माण केल्यामुळे व सर्व सामान्य जनतेत भय, भिती तथा दहशतीचे वातावरण निर्माण करून सामाजिक शांतता भंग करून हिंदू-मुस्लिम दंगलीचे वातावरण निर्माण केल्यामुळे त्यांचेवर योग्य त्या कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना सदर परिसरात पुन्हा न येण्याची चेतावणी देण्यात यावी अथवा त्यांना संबंधीत परिसरातून हद्दपार करण्यात यावे ही विनंतीचे निवेदनाचे पत्र नुकताच बारामती शहर पोलीस स्टेशन येथे कुरेशी समाज बांधवांच्या सह्यनिशी देण्यात आले.

No comments:

Post a Comment