देसाई इस्टेट मध्ये राष्ट्रवादी युवक शाखे चे उदघाटन संपन्न
बारामती: बुधवार दि.18 ऑगस्ट रोजी देसाई इस्टेट मध्ये बारामती शहर राष्ट्रवादी युवक च्या शाखेचे उदघाटन देसाई इस्टेट च्या मुख्य चौकात करण्यात आले.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,शहर राष्ट्रवादी अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, युवक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष अमर धुमाळ, नगरसेवक अतुलजी बालगुडे,दंतरोग तज्ञ डॉ साकेत जगदाळे,युवती राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा भाग्यश्री धायगुडे,राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र काटे ,शहर राष्ट्रवादी उपाध्यक्ष छगन आटोळे,संग्राम खंडागळे,न्यू शिवक्रांती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत नवसारे,सामाजिक कार्यकर्ते राहुल वायसे आदी मान्यवर व देसाई इस्टेट मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.नीरा डावा कालवा सुशोभीकरण मुळे देसाई इस्टेट चे महत्व वाढत असताना वृषारोपन व वृक्षसंवर्धन साठी देसाई इस्टेट मधील युवकांनी पुढाकार घ्यावा त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेसुसार जवाबदारी देणार असल्याचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले.
देसाई इस्टेट मधील युवकाचे कोरोना काळात योगदान महत्वाचे असून लोकसभा,विधानसभा व नगरपरिषद मध्ये कार्य उललेखनिय असल्याचे सर्व मान्यवरांनी सांगितले.शाखा अध्यक्ष युवराज गजाकस,उपाध्यक्ष अमोल पवार,कार्याध्यक्ष आकाश काटे,सचिव जावेद शेख,सहसचिव अक्षय बनकर,संघटक अमोल जाधव यांनी उपस्तितांचे स्वागत केले.
आभार नगरसेवक अतुल बालगुडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment