रुग्ण हक्क परिषदेचा २ ऑक्टोबरला मुंबईत 'महामोर्चा'!
कोरोना रुग्णांच्या बिलांचे लेखापरीक्षण व्हावे ही मागणी!
पुणे- 'कोरोना रुग्णांच्या बिलांचे फेर लेखापरिक्षण व्हावे' या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषद येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून, मुंबईत मंत्रालयावर विराट 'आक्रोश महामोर्चा' काढणार आहे. यासाठी 'राष्ट्र सेवा दल' या ठिकाणी राज्य कमिटीची महत्वपूर्ण बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीस राज्यभरातील प्रतिनिधी उपस्थित होते.
परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी पुण्यात झाली. या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आनंद शेट्ये, कार्यालयीन सचिव संजय जोशी, महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. सलीम आळतेकर, महाराष्ट्र प्रदेश संघटक शैलेश खुंटये, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नितीन शिंदे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनील शेजवळ, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय लोहार, कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पांचाळ, विदर्भ प्रदेशाध्यक्ष अमोल गीते, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष बाबा चोबे, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष अहमद बाबा बागवाले, सोलापूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष कल्पना पवार, पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अपर्णा साठ्ये, पिंपरी-चिंचवड महिला आघाडी अध्यक्ष प्रीती खुंटये, पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ तारकश, पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रकाश तोरणे, परभणी जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पुंड, केंद्रीय कार्यालय उपसचिव गिरीश घाग, गणेश भोईटे, रामचंद्र निंबाळकर, गणपतराव फराटे उपस्थित होते.
कोरोना बिलाबाबत सोलापूरमधील माढा तालुक्यामध्ये रुग्ण हक्क परिषदेने फेर लेखापरीक्षणाची मागणी केली होती. यात सुमारे २० लाख ४२ हजार दोनशे १४ रुपये ही रक्कम अतिरिक्त आढळून आली. आणि ही जास्त वसूल केलेली रक्कम नागरिकांना धनादेशाद्वारे पुन्हा देण्यात आली. या मोहिमेस "माढा पॅटर्न" असे नामकरण करण्यात आले. अशाच प्रकारे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माढा पॅटर्न लागू करून कोरोना बिलामधील तफावतीबाबत खाजगी रुग्णालयांचे फेर लेखापरीक्षण करण्याच्या मागणीचा ठराव रुग्ण हक्क परिषदेत एकमताने मंजूर झाला. यावेळी मोर्चा नव्हे, तर महामोर्चा करणं जरुरीचे आहे. यासाठी आजाराला बळी पडलेल्या लोकांसह समस्त नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे अवाहन परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी उपस्थित असणाऱ्या सदस्यांना केले.
संघटनेच्या रुपात रुग्णांचे हक्क माहीत झाले. मधमाश्यांचे पोळ जसे एकमेकांचे संरक्षण करतात तसेच उमेश चव्हाण यांच्या रुपात देव मिळाला. अशी भावना संघटनेचे समन्वयक गणेश भोईटे यांनी व्यक्त केली. प्रत्येकाने आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे. तरच संघटनेचे बळकटीकरण होईल. स्तुती करण्यापेक्षा 'गौरव' करणं जरुरीचं, अशा शब्दांत शिरूर तालुक्याचे समन्वयक रामचंद्र निंबाळकर यांनी संघटनेविषयी आपली भावना व्यक्त केली.
यावेळी अनेक विषयांवर विचारमंथन करण्यात आले. संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील यांना संघटनेचे संस्थापक उमेश चव्हाण यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. डॉ. सलीम आळतेकर यांनी प्रास्ताविक केले, तर संघटनेचे सचिव संजय जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.
No comments:
Post a Comment