पालखी मार्गाचे भूसंपादन येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचा आदेश.. बारामतीतून जाणार तक्रारीचे निवेदन मुंबई:- पालखी मार्गाचे भूसंपादन येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी आदेश जिल्हा प्रशासनाला दिला. तसेच जे ठेकेदार चुकीच्या पद्धतीने रस्त्याची कामे करून नागरिकांना वेठीस धरतात, अशांना तातडीने काळ्या यादीत टाकण्याचे
आदेशही त्यांनी अधिकार्यांना या वेळी दिले.पुण्यातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बैठकीत केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरी यांनी हे आदेश दिले. पुण्यातून सुरू होणाऱ्या दोन्ही पालखी मार्गांचा आढावा घेऊन तातडीने काम मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पुण्यात राष्ट्रीय महामार्गाची सुरू असलेल्या कामांत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आवश्यक जागा प्राधिकरणाकडे वर्ग कराव्यात, काही ठेकेदार
चुकीच्या पद्धतीने रस्त्यांचे आरेखन करत असतात, त्यामुळ नागरिकांना त्रास होतो. अशा ठेके दारांवर कडक कारवाई करावी. केंद्राने राष्ट्रीय महामार्ग विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. पुणे-सातारा महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग, दोन्ही पालखी मार्ग, चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे काम तत्काळ मार्गी लावावे, असे आदेश गडकरी यांनी या वेळी दिले.दरम्यान, पालखी मार्गातील पुणे जिल्ह्यातील झेंडेवाडी,पवारवाडी, दिवे आणि जेजुरी येथील भूसंपादन होणे बाकी आहे.जेजुरी गावातून हा मार्ग न्यायचा, की बाह्यवळण मार्ग करायचा याबाबत निर्णय विलंबाने घेतल्याने भूसंपादन बाकी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून गडकरी यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बारामती, इंदापूर, दौड यागावातुन पालखी मार्गासाठी गेलेल्या जमिनी चा मोबदला मिळण्यासाठी होत असलेली जमीन मालकांची कसरत व त्यांना नाईलाजाने द्यावी टक्केवारी ही सध्या डोकेदुखी होत आहे, या कार्यालयात येत असलेले एजंट हे राजकिय पक्षाचे पदाधिकारी तर वकिली काम करणारे काही जण, तर काही खाजगी एजंट या कार्यालयात सतत येत असून त्यांच्या मार्फत फाईल प्रकरण हे मंजूर होत असल्याचे सांगितले जातेय याबाबत उपविभागीय अधिकारी यांना याची कल्पना दिली असली तरी मात्र येथे होत असलेली जमीन मालकांची पिळवणूक होत असलेला मानसिक त्रास किचकट कागदोपत्री कारण यामुळे अक्षरशः वैतागून गेला असल्याने लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पत्र देऊन या चालत असलेल्या घटनेचा लेखाजोखा मांडणार असल्याचे सांगितले*
No comments:
Post a Comment