उमरी तालुक्यातील काँग्रेसला त्रिशंकू गटबाजीच लागले ग्रहण !!
उमरी प्रतिनिधी :- गंगाधर गायकवाड निमटेककर
उमरी - शहरासह, तालुक्यातील काँग्रेस पक्षामध्ये गेली अनेक वर्षापासून या अंतर्गत गटबाजी सुरु असुन मी काँग्रेस चा कि अशोकराव चव्हाणाचा तर कोणी म्हणतो वसंतराव चव्हाणाचा आणखी एक मारोतराव कवळे गुरुजी यांच्या एका गटाची भर पडल्याने आता काँग्रेस मध्ये त्रिशंकू गटबाजी उदयास तीन तिघाडी काम बिघाड आवस्था आल्याची चर्चा असुन पक्ष एक असला तरी हाम साथ साथ है म्हणले तरी कार्यकर्ते नेमके कोणाच्या मागे जावे हे अडचण निर्माण झाली आहे वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या बॅनंर बाजी मधुन उद्योजक कवळे गुरुजी यांना डावळल्याने पक्षा अंतर्गत वाद निर्माण होत नसलातरी विरोद्धकाच्या हाती काँग्रेस वृतीचे आयते कोलीत मिळाले आहे उमरी नगरपरिषद जि प पंचायत समिती निवडणूका आता जवळ आल्या आहेत उमरी तील काँग्रेस चा हा वादाचा फंडा नेहमी चर्चेत असतो तात्कालिन आमदार वसंतराव चव्हाण अपक्ष म्हणून निवडून आले तेव्हा अपक्ष आमदार विरुद्ध काँग्रेस होते पाटील मडळीत गट न एक आणी गट न दोन तिसरा मागास्वर्गीय सेल्स नावाचा नावालाच असलेला वर्ग असे गटातटाचे राजकारण सुरू झाले कधी गोविंदराव सिधीकर तर लिगराम पाटील कवळे तर कधी वरचेच संजय कुलकर्णी गट निर्माण झाले त्यामुळे १५ वर्ष नगरपरिषद ची सत्ता गोरठेकर याच्या ताब्यात गेली आहे जुने कार्यकर्ते बापुसाहेब गोरठेकर समर्थक म्हणून काम केलेले प्रल्हाद पाटील हे उमरी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले त्यानी कोणत्याही गावात शाखा खोलुन पक्ष वाढवण्याचे कार्य केले नाही केवळ नावालाच तालुका पदावर राहील्या मुळे काॅग्रेस पक्षांची बांधलकी झाली नाही.
कोणत्याही गावात शाखा खोलन्याचा आदेश पण नाही अस बोल जातं.
त्यामुळे गोरठेकर यांचे राजकीय प्लॅन मध्ये प्रल्हाद पा ईज्जतगावकर हे नाहीत ना अशी शंका हि उमरीकर करीत आहेत नगरपरिषद गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते संजय कुलकर्णी यांना डावळण्यात आले व संजय हे गोरठेकर गटाशी हातमिळवणी गेल्या नगरपरिषद निवडणूकी नंतर बदनामीची चर्चा करण्यात आली त्यांचे कारण म्हणजे काॅग्रेस गटाचा पाटील मंडळींचा दुसरी राजकीय खेळी होय अशोकराव चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवुन उद्योजक कवळे गुरुजी ही गोरठेकर यांना शह देवुन काॅग्रेस सोबत लोकसभेच्या निवडणुकीत इमाने इतबारे काम केले म्हणून त्यांना अशोकराव चव्हाणानी जवळ केले येणारी विधानसभेची तयारी कोण करावी वसंतराव की कवळे गुरुजी असे दुमत झाले असुन उमरीच्या सभेत ही अशोकराव चव्हाण यांनी वसतराव व कवळे गुरुजी एक होण्याची गरज आहे असे आदेशित केले होते माजी आ वसंतराव चव्हाण यांच्या एका समर्थक कार्यकर्त्याच्या बॅनंर वर उद्योजक कवळे गुरुजी यांना डावलल्याने आता पासुनच गुरुजी बॅनंर वरुन गायब करण्याचे षडयंत्र हे कशाचे घोतक समजावे उमरी नगरपरिषद निवडणूकीत जेवढे संजय कुलकर्णी व कवळे गुरुजीचे वजन पडते तेवडे एका पाशागाचे वजन शहर तालुक्यात प्रल्हाद पा हस्सेकर यांचे पटत नाही जातीत गट पक्षात गट मागास्वर्गीय पक्षात नावाला स्थान देणारे पक्षाला मरगळ अनणारे म्हणजे काॅग्रेस अध्यक्ष प्रल्हाद पा. ईज्जतगावकर आहेत अशा नविन वादाला तोंड फुटला असुन येणार्या कोणत्या ही निवडणूकीत काॅग्रेस पक्षाला किंमत मोजावी लागणार आहे वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या बॅनंर वरुन उमरीला अंतर्गत गटबाजी पाहुण धोक्याची राजकीय घंटा वाजल्या शिवाय राहणार नाही उमरी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांना नैतिक जबाबदारी म्हणून वसंतराव चव्हाण यांच्या वाढदिवसाचे जाहिरात संदर्भात विचारणा केली असता जे लोक तहसीलदार कडुन हप्ते खातात किंवा वसुली करतात ते जाहिरात देतात मी काय सोयाबीन गहू विकुन जाहिरात देवू का अशा प्रश्न उपस्थित करुन माजी आमदार वसंतराव चव्हाण बदल किती पुळका आहे हे कळाले असुन असे व्यक्तव्य हे सामाजिक जबाबदारी स्वीकारून आहे की काॅग्रेस ला संपविण्याचा व्यक्त केलेली भावना आहे हे काॅग्रेस नेत्यांनीच तपासून पाहावे यांचा अर्थ असा की जो हप्ते खातो हप्ते वसुली करतो तर मग आजी माजी आमदार मा खासदार मा मंत्री लोकप्रतिनिधी जाहीरात देतात ते हप्ते खातात यांची यादी उमरी काॅग्रेस पक्षाचे अध्यक्षानी जाहीर करावे असे बोलले जात आहे यावेळी काॅग्रेस जेष्ठ माजी तालुका अध्यक्ष गोविंदराव सिंधीकर व पत्रकार उपस्थित होतेअशी माहिती प्रतिनिधी यांनी दिली.
No comments:
Post a Comment