*संत निरंकारी मंडळाच्या मदत कार्याचे बाधित ग्रामपंचयातीकडून कौतुक*
बारामती - (अशोक कांबळे) सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोऱ्यात, वाई तालुक्यातील जोर गावात तसेच जावली तालुक्यातील तेटली आणि मुकबली यासह परिसरातील ११ गावात अतिवृष्टीने थैमान घातल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते.
अशा संकटाच्या काळात मानवतेच्या भावनेतून संत निरंकारी मिशन सातारा झोनचे झोनल प्रमुख नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक किशोर माने यांनी बारामती क्षेत्रातील जवळपास पन्नास ते साठ सेवादलांना घेऊन कांदाटी खोऱ्यातील ११ गावांना जीवनावश्यक वस्तू , अन्न धान्य, किराणा साहित्य, औषधे-गोळ्या, चप्पल, कपडे आदींचे वाटप करण्यात आले.
यामध्ये इलेक्ट्रशन, प्लबर, फिटर, वेल्डर व पशुवैद्यकीय डॉक्टर यांचा समावेश होता.
अशा संकट प्रसंगी निरंकारी मिशनच्या माध्यमातून तात्काळ मदत कार्य सुरू केल्यामुळे संत निरंकारी मंडळाच्या सेवा कार्याचे बाधित भागांतील
१) मुकबली ग्रामपंचायत, ता. जवली, जि. सातारा
२) जोर ग्रामपंचायत, ता. वाई जि. सातारा
३) तेटली ग्रामपंचायत, ता. जावली, जि. सातारा
यांच्यासह सातारा जि. प. चे अध्यक्ष श्री. उदय सदाशिव कुबले
यांनी लेखी पत्राद्वारे संत निरंकारी मिशनने उल्लेखनीय कार्य केल्याचे प्रामाणित केले आहे
No comments:
Post a Comment