गोरगरिबांना कोरोनावर मोफत उपचार मिळण्यासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांच्या सोबत एन.डी.एम.जे संघटनेची बैठक संपन्न - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, August 11, 2021

गोरगरिबांना कोरोनावर मोफत उपचार मिळण्यासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांच्या सोबत एन.डी.एम.जे संघटनेची बैठक संपन्न

*गोरगरिबांना कोरोनावर मोफत उपचार मिळण्यासाठी बारामती प्रांताधिकाऱ्यांच्या सोबत एन.डी.एम.जे संघटनेची बैठक संपन्न*

इंदापूर : नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस (एन.डी.एम.जे) या संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्य महासचिव ऍड.डॉ.केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सचिव वैभव गिते यांच्या नेतृत्वाखाली  उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी बारामती दादासाहेब कांबळे व तहसीलदार अनिल ठोंबरे यांची इंदापूर तहसील कार्यालयात भेट घेऊन चर्चा करून निवेदन दिले.
महात्मा ज्योतिबा फुले जणआरोग्य योजनेअंतर्गत कोरोना (Covid 19 )  उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांमध्ये  सर्व जाती-धर्मातील नागरिकांना संक्रमण होऊन बाधा झाल्यास अंगीकृत खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत म्हणून यापूर्वीही प्रांताधिकारी बारामती यांच्याशी चर्चा केली होती.बारामती मध्ये चार खाजगी अंगीकृत दवाखाने आहेत,ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना (Covid 19 ) वर मोफत उपचार करू शकतात व त्यांना मोफत उपचार करावेच लागतात ज्यामध्ये केशरी शिधा पत्रिका,पिवळी शिधा पत्रिका मधील लोकांना मोफत उपचार मिळतात.तो कोणत्याही जाती धर्माचा असो यांच्यावर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे, पण बारामती मधील हॉस्पिटल वाले मुजोरी करतात, गरिबांची आर्थिक लूट करतात. गरीब जनतेकडून भरमसाठ पैसे घेतात.याचे पुरावे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने तहसिलदार अनिल ठोंबरे व प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले. शासन सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून गरिबांना मोफत उपचार मिळावेत म्हणून निधी देत आहे.शासनाने पांढरी शिधा पत्रिका धारकांनाही आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. पण हे दवाखान्यातील हॉस्पिटल गरिबांना त्याचा लाभ घेऊ देत नाहीत.तरी या दवाखान्यावरती तत्काळ कारवाई करावी.अन्यथा तहसिल कार्यालयापुढे 15 ऑगस्ट रोजी झेंडा वंदन करू देणार नाही असा इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने तहसिलदार इंदापूर व प्रांत अधिकारी बारामती यांना देण्यात आला.तरी सामान्य नागरिकांना हे मोफत उपचार दवाखान्यात मिळत नसतील तर नागरिकांनी तहसिलदार इंदापूर , बारामती व प्रांत अधिकारी बारामती यांच्याकडे लेखी तक्रारी कराव्यात म्हणजे सामान्य नागरिकांना उपचार मोफत मिळतील. निवेदन देताना उपस्थित नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य सचिव वैभव तानाजी गीते इंदापूर तालुका अध्यक्ष वैभव तानाजी धाईंजे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष शिवाजी गोविंद बनसोडे, इंदापूर तालुका सदस्य अतुल बनसोडे, पंढरपूर तालुका सदस्य बबन नवगिरे, इंदापूर तालुका सदस्य युवराज गायकवाड, प्रणव भागवत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment