मा.स्व.सूरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशन चा पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, August 6, 2021

मा.स्व.सूरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशन चा पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात.

*मा.स्व.सूरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशन चा पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात.*
 पुणे:- महाराष्ट्रात संततधार पावसामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र विभागात पूरस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूरमध्ये ही पुरामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली या पूरग्रस्तांच्या मदतीला *राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका संध्याताई सूरदासजी गायकवाड* सरसावल्या आहेत त्यांच्या बरोबरच सौ.रेखा पटेल,सचिन अवघडे,नितीन जाधव, युवराज गायकवाड,विश्वजीत हाके, प्रतिक पटेल, कुणाल जाधव,जयराज गायकवाड व नागरिक हे मदतीला आले आहेत या पूर परिस्थितीमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले अनेक नागरिक अडचणीत आले ,लहान मुलांचे, अतोनात नुकसान झाले या पूरग्रस्तांच्या मदती करिता मा.सुरदासजी गायकवाड सोशल फाउंडेशन च्या वतीने मुबलक असे  अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात आल्या आहेत.
या पूरग्रस्तांच्या मदतीकरिता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले होते आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत फुगेवाडी तील ग्रामस्थ व युवा तरुण पिढी यांनी पूरग्रस्तांसाठी भरपूर मदत केली त्यांचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करते असेच यापुढेही दानशूर व्यक्तीने पूरग्रस्तांसाठी मदत करावी

No comments:

Post a Comment