*कराटे बेल्ट परीक्षा व मुफ्त प्रशिक्षण शिबीर संपन्न*
बारामती:- बारामतीतील "युनिक स्पोर्ट्स अँड शोतोकान कराटे-डो आसोशिएशन" ने घेतलेल्या ब्लॅक बेल्ट डिग्री बेल्ट व कलर बेल्ट परीक्षा तसेच लहान मुलांना लहानपणा पासूनच व्यायामाची सवय लागावी म्हणून मूफ्त प्रशिक्षण वर्ग यशस्वी पणे पूर्ण झाला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा परिषद,भारत सरकार तर्फे देण्यात आलेला सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते सेन्सेई गणेश भिमराव जगताप यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबीर संपन्न झाले.
ब्लॅक बेल्ट 1 डिग्री मध्ये ओम बांगर,प्राची गिरमे,शेखर गोसावी,वैष्णवी गोसावी व ब्लॅक बेल्ट 2 डिग्री मध्ये समर्थ वणवे,आकाश सायकर,सुप्रिया जगताप,स्नेहल तांदळे तसेच राष्ट्रीय खेळाडू अनुराग देशमुख 3 डिग्री परीक्षा उत्तीर्ण होऊन यश संपादन केले.
यशस्वी कराटे खेळाडूंचे बारामतीचे उपनगराध्यक्ष श्री.अभिजित जाधव,माजी उपनगराध्यक्ष श्री.बिरजू मांढरे, पुणे जिल्हा सचिव श्री.सुनीलभाऊ शिंदे (आर पी आइ आठवले),श्री.हनुमंत मोरे (मामा) मोरेश्वर शिक्षण व सामाजिक संस्था,श्री.प्रशांत शिंदे पाटील (माजी संचालक माळेगाव साखर कारखाना) यांनी सर्वांचे अभिनंदन केले तसेच संस्थेचे पदाधिकारी अतुलशेठ गोटे,प्रशांत गाढवे,वंदना मोरे,भिमराव जगताप यांनी सर्व यशस्वीचें अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्या दिल्या.
No comments:
Post a Comment