एका वादळाचा अस्त......!
-----------------------------------------------------
कोल्हापूर, शशिकांत शामराव कुंभार
------------------------------------------------------
रविवार. दि. 22 ऑगस्ट 20 21
--------------------------------------------------------
कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संजय सिंह रामराव चव्हाण यांना मातृ व पितृशोक.
--------------------------------------------------------
कै.रामराव उर्फ बाळासाहेब चव्हाण मु.पो.भोळी, ता खंडाळा, जि.सातारा.यांचा नीरा नदी काठी दशक्रिया विधी दिनांक २३/८/२०२१ रोजी सकाळी १०:०० वाजता करण्यात येणार आहे.
--------------------------------------------------------
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नीरा नदीच्या काठी असलेल *भोळी* एक छोटसं गाव.
या गावी स्वातंत्र्य पूर्व काळात काँग्रेस विचाराच्या ,प्रतिसरकार च्या नेतेमंडळी ना मदत करणाऱ्या गणपतराव चव्हाण तथा गणुबुवा यांचा जेष्ठ मुलगा या नात्याने १९३६ मध्ये रामराव यांचा जन्म झाला. नीरा नदीकाठी भोळी गावात बालपण आणि प्राथमिक शिक्षण झालं माध्ममिक शिक्षण जुनी अकरावी पर्यतच शिक्षण जवळच असलेल्या शिरवळ येथील आदर्श विद्यालयात झाले. सुरुवातीची काही वर्षे मुंबई पोलीस मध्ये काम केले. यलो गेट पोलीस स्टेशन कार्यरत असताना हाजी मस्तान, करीमलाला च्या टोळीतील गुंडावर निर्भयपणे कारवाई केली. डिपार्टमेटंल परीक्षेत राज्यात प्रथम येऊन ही पोलीस उपनिरीक्षक पदाचे पदोन्नती साठी डावलले गेल्यानंतर तसेच पोलिस मधील कार्यपद्धती न रुचल्यामुळे राजीनामा देऊन गावी येऊन शेती करु लागले सोबतच किराणा मालाचे दुकान चालू केले. १९७१ पासून स्वस्त धान्य दुकान चालू केले. त्याचबरोबर राजकारण, समाजकारणात सहभाग घेतला. गावाती विकास सोसायटीचे चेअरमन म्हणून सलग १६ वर्षे कार्यरत राहीले. गावी ८ वी ते अकरावी पर्यतचे विद्यालय चालू करण्यात मोठे योगदान दिले. सुरुवातीची काही वर्षे विद्यालयाला इमारत नसताना स्वतः चे वाड्यात विद्यालय चालू ठेवले.शिक्षकाच्या पगारासाठी गावातून परिसरातून लोकवर्गणी गोळा करुन ते चालवले. रोख रक्कम देऊ न शकणाऱ्या ग्रामस्थाकडून तेव्हा नदी काठच्या गाळपेरीत होणारा गहू स्विकारुन त्याचे विक्रीतून निधी उभारला .स्वतः ची शैक्षणिक संस्था निर्माण न करता अनुदान चालू झाले कि शाळा रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात दिली. खंडाळा तालुका ८७ अवर्षण प्रवण दुष्काळी तालुक्यात असताना हिंदूराव नाईक निबांळकर,बाळासाहेब बागवान यांचे सोबत पाणी खंडाळा-फलटण तालुक्यातील दुष्काळी भागाला धोम धरणाचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी पाणी पंचायती मार्फत पुकारलेल्या लढ्यात आग्रभागी राहून योगदान दिले. नागनाथअण्णा नायकवडी, भारत पाटणकर यांच्या सोबतच्या दुष्काळी तालुक्यांना हक्काचे न्याय पाणीवाटप मिळावे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याच्या लढ्यात सतत सहभाग घेतला. खंडाळा तालुक्यातील काँग्रेस चे सक्रीय कार्यकर्ते व कार्यकारी अध्यक्ष म्हणून दिर्घ काळ कार्यरत राहिले. १९७८ साली काँग्रेस व इंदिरा गांधी च्या पराभवानंतर त्या चिक्कमंगरुळ ,कर्नाटक येथील निवडणूक प्रचारावरुन परत येत असताना पुणे बंगलोर नँशनल हायवेवर शिरवळ येथे साध्या लोखंडी काँटवर उभे राहून इंदिरा गांधी यांनी उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्या सभेचे नियोजन त्यांनी केले. तालुका रास्त भाव संघटनेचे अध्यक्ष, तालुका समन्वय समिती सदस्य, तालुका दक्षता समिती सदस्य, खंडाळा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक, छत्रपती सुमित्राराजे भोसले पतसंस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, स्वातंत्र्य सैनिक बाबूराव घोरपडे व स्वातंत्र्य सैनिक न.म. सस्ते गुरुजी बँकेचे अध्यक्ष असताना त्यांचेसोबत उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले. ६५ ग्रामीण भागातील तरुणांना बँकेत नोकरी मिळवून दिली. सातारा जिल्हा पुनर्वसन समिती वर काम करत असताना १९६० साली वीर धरणग्रस्त झालेल्या भोळी,तोंडल,लोणी तील धरणग्रस्तांना तेव्हा पुनर्वसन कायदा नसल्याने पर्यायी जमीन मिळालेल्या नव्हत्या अशा सर्व धरणग्रस्तांना १९८५ ते १९९१ साली सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यात जमीन मिळवून देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. शिरवळ येथे आदर्श विद्यालयाचे माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयात चालू करुन ते ही सुरुवातीला लोकवर्गणीतून चालवून अनुदान प्राप्त झाले नंतर रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात दिले. या आदर्श विद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे माध्यमातून मित्र परिवाराच्या सहकार्यातून काँलेज चालू करण्यात योगदान दिले. याच संघटनेच्या माध्यमातून निवृत्त अधिक्षक अभियंता राम चव्हाण यांचे नेतृत्व खाली खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठान स्थापनेपासून संस्थात्मक विश्वस्त म्हणून कार्यरत राहून शेतकऱ्यांना विविध योजनांचा, आधुनिक शेतीचा लाभ व मार्गदर्शन केले. दुष्काळी तालुक्यात पाझर तलाव, नालाबांध,कंटुर बंडिग इत्यादी जलसंधारणाची विविध कामे केली. गणेश सहकारी दुध उत्पादक सोसायटी, लक्ष्मी सहकारी मजूर संस्था, गणेश गोबर गँस सहकारी संस्था इत्यादी सहकारातील संस्थाची स्थापना केली. अतिशय स्पष्टवक्तेपणा व अन्यायाची चिड हि स्वभाव वैशिष्ट्ये असल्याने खोटे बोलता न येणे चुकलेल्या कार्यकर्त्यांला खडे बोल सुनावणे व तापट स्वभाव यामुळे क्षमता असूनही राजकारणात मर्यादित यश मिळालेले हे वादळ आयुष्याचे शेवटी शांत होऊन अखेर १४ आँगस्ट रोजी विसावले व ज्या सहचारिणी ने तब्बल ६० वर्षे साथ दिली तीचा वियोग सहन न झाल्याने तीच्या पाठोपाठ स्वर्गात तीच्या साथीसाठी निघून गेले.
No comments:
Post a Comment