भिगवण:- दिनाक,२४/०८/२०२१,रोजी सकाळी १०:००वा चे सुमारास भिगवण पोलीस स्टेशनचे फोनवर माहीती मिळाली की, मौजे भादलवाडी गावचे हददीत निरा भिमा नदी जोड प्रकल्प येथील डंपिग यार्डमध्ये टाकलेल्या दगडयांच्या ढिगाच्यावर एक अनोळखी पुरूष जातीची बॉडी पडलेली आहे अशी माहीती मिळाताच घटनेचे गाभीर्य ओळखुन भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. दिलीप पवार,
सहा.पोलीस.निरीक्षक, यांनी तात्काळ पोलीस स्टाफ यांना मदतीस घेवुन घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी अनोळखी पुरूष इसमाची मयत बॉडी ही अतिशय निघृणपणे गळा चिरलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. प्रथम सदर अनोळखी मयताची ओळख पटविणे अत्यंत जिकरीचे असताना पोलीसांनी कसोशिने व चिकाटीने मयताची ओळख पटवुन त्याचे नाव महेश दत्तात्रय चव्हाण, वय, ३४ वर्ष,रावणगाव, एरीगेशन कॉलनी, कांबळेवस्ती, त्याचे नातेवाईक यांचेशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतले. मयताना भाऊ श्री.नितीन दत्तात्रय चव्हाण,
याने त्याचा भाऊ महेश दत्तात्रय चव्हाण याचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्यराने गळा चिरून खुन केला म्हणून तक्रार दिली. त्यानुसार भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा.र नंबर, २०९/ २०२१, भा.द নি कलग, ३०२ प्रमाणे अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून तपास चालु केला.सदर गुन्हया हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने सदर गुन्हा घडले ठिकाण हे निर्जनस्थळ असल्याने सदर ठिकाणी गुन्हा घडलेच्या येणेचे दुष्ट्रीने कोणतेही धागेदोरे व पुरावा नसताना दिलीप पवार, सहा.पो.निरीक्षक यांनी तात्काळ तीन टिम तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केल्या,सदर गुन्हयाचे तपासामध्ये गोपनिय बातमीदार व तात्रिक विश्लेषनाचे आधारे यातील मयत महेश दत्तावरय चव्हाण याची पत्नी हिचे तिच्या गावातील घराचे शेजारी राहणारा इसम नामे अनिकेत उर्फ बबलु
विकास शिंदे,वय.२१वर्ष, रा. अकोले समाज मंदीराशेजारी ता. इंदापुर जि.पुणे, यांचे सोबत पुर्वी पासुन प्रेम संबंध असल्याची माहीती मिळाली. त्या अनुशांने मयत याची पत्नी हिचा प्रियकर अनिकेत उर्फ बबलु विकास शिदे, रा.अकोले, ता.इंदापुर जि पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्यावेळी त्यास विश्वासात घेवुन पोलीस खाक्या दाखविताच त्याने माझे महेश याची पत्नी हिचे सोबत प्रेमसबंध होते मयत महेश याचे मुळे मला माझी प्रियसी हिला भेटता येत नव्हते. त्यामुळे त्याचे मनामध्ये मयत महेश याचे बदद्ल राग निर्माण झाला होता. त्यामुळे
त्याने त्याचा चुलत भाऊ गणेश हनुमंत शिंदे यास मदतीस घेवुन महेश याचा काटा काढण्याचे नियोजन केले, गणेश शिंदे याचे पण मनामध्ये महेश याचे बाबत राग होता. कारण गणेश याची पत्नी हिचे पण त्यास घटस्फोट दिला होता. तो घटस्फोट महेश याने त्याचे नातेवाईकांना सांगितल्यामुळे दिला होता असा गणेश शिंदे याचा पण समज झाला होता. त्यामुळे तो पण महेश याचेवर चिडुन होता. त्यामुळे अनिकेत शिदे व गणेश शिंदे हे दोघे एकत्र येवुन त्यांना दोघांनी प्लॅनीग करून दिनांक २३/०८/२०२१ रोजी
रात्रौ १०:०० वा चे सुमारास अकोले येथुन गप्पा मारण्याचे बहान्याने त्याचे घराचे पासुन थोडे अंतरावर असलेल्या निरा भिमा नदी जोड प्रकत्पाचे बोगदयाजवळ डंपिग यार्ड येथे निर्जन स्थळी नेवुन त्याचा धारदार कोयत्याने गळा कापुन खुन केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयात आरोपी
नामे १) अनिकेत उर्फ बबलु निकास शिंदे,वय २१ वर्ष, २) गणेश हनुमंत शिंदे, वय २८वर्ष दोघे रा.
अकोले, समाज मंदीराशेजारी, ता. इंदापुर, जि.पुणे, यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो इंदापुर न्यायालय यांचे न्यायालयामध्ये हजर करण्यात आले आहे. त्याना ६ दिवस पोलीस कोठडी रिमांड देण्यात आली आहे,सदरची कामगिरी ही मा. डॉ.अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक ,पुणे ग्रामीण, मा.मिलिंद मोहीते , अपर पोलीस अधीक्षक, वारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. नारायण शिरगावकर ,उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, मा. अशोक शेळके सो, वरीष्ठ पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा.दिलीप पवार
सो, सहा.पोलीस निरीक्षक, मा. सुभाष रूपनवर, पोलीस उपनिरीक्षक, मा. विनायक दडस पाटील पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अंमलदार नाना वीर, विठठ्ल वारगड, समीर करे, सचिन पवार, महेश उगले,केशव चौधर, महेश माने, संदीप पवार, विजय लोढी, अंतुल पठाण, पालसांडे, भांडवलकर, अंकुश माने, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, अनिल काळे, रवीराज कोकरे यांनी समांतर तपास करून गुन्हा उघडकिस आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
No comments:
Post a Comment