उद्योजक मारोतराव कवळे गुरूजीचां सन्मान माजी मंञी डि.पी.सावंत यांच्या हस्ते संपन्न. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, August 17, 2021

उद्योजक मारोतराव कवळे गुरूजीचां सन्मान माजी मंञी डि.पी.सावंत यांच्या हस्ते संपन्न.

उद्योजक मारोतराव कवळे गुरूजीचां सन्मान माजी मंञी डि.पी.सावंत यांच्या हस्ते संपन्न.

      उमरी प्रतीनीधी-शेख आरीफ

उमरी:- सहकार क्षेत्रात निष्ठेने काम करुन शेतकऱ्यांचा उध्दार करणारा निष्ठावंत कार्यक्रता ना.अशोकराव चव्हाणांना मारोतराव कवळे गुरूजीच्या रुपाने मिळाला.त्यामुळे भावी काळात सहकार क्षेत्र जोमाने पुढे जाईल.तसेच तुमच्या सारखा हिरा ज्यांनी पारख नाही केला तो जोहरी नाही आता तुम्ही खरे जोहरा कडे आलात आहात.अशोकराव चव्हाण तुम्हाला दुर जाऊ देणार नाहीत.सहकार व  राजकीय क्षेत्रात नक्कीच कवळे गुरूजी पुढे जाल येणा-या काळात तुमचे भविष्य उज्ज्वल आहे असा विश्वास माजीमंञी डि.पी.सावंत यांनी व्यक्त केले.
नांदेड येथील हॉटेल अमृत येथे लोकनेते तथा व्ही.पी.के.उद्योग समूहाचे चेअरमन  मारोतराव पाटील कवळे गुरुजी यांना संगमनेर येथे उद्योग रत्न पुरस्कार मिळाल्याने कै.व्यंकटराव पाटील कवळे बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधी ता. उमरीच्या वतीने भव्य सत्कार माजी मंञी डि.पी.सावंत यांच्या हस्ते ता.१४ ऑगस्ट रोजी करण्यात आला.तसेच जिल्ह्यात कोरोणा काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीळकंठ भोसीकर,व जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी होम डिवाय एस पी विकास तोटावाड आधिचा कोविड योध्दा म्हणुन सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले..यावेळी सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  माजी मंत्री डी.पी.सावंत  हे होते,ते प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी, अनिल मोरे, माजी उपमहापोर आनंद चव्हाण,आर डी कवळे, जगनदादा शेळके ,तहसीलदार राजेश लांडगे, सुनील माचेवाड, पतसंस्थेचे व्हायचेअरमन माधव पाटिल बोडके,संदीप पाटील कवळे, शेळके,सुनील सूर्यवंशी,माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, सिंधीचे सरपंच प्रभाकर पाटील पुयेड,गणेश पाटील सरसे,मलीकाअर्जुन  चंदापुरे,नवीन जी काबरा, परमेश्वर पाटील कवळे ,प्रल्हाद पाटील हिवराळे,नागनाथ पांचाळ, आधी होते.पुढे बोलताना डी.पी.सावंत म्हणाले.मारोतराव कवळे गुरूजी यांचे सहकार क्षेत्रातील कार्य अनुकरणीय आहे. नांदेड जिल्ह्य़ातील सहकार चळवळ श्री.श्यामराव कदम यांच्यानंतर मंदावली होती.ना.अशोकराव चव्हाणांना सहकार क्षेत्रातील एक हिरा कवळे गुरूचीच्या रुपाने मिळाला आता सहकार क्षेत्राला चांगले दिवस येतील शेतकऱ्यांचा सहकार क्षैञावरचा विश्वास गुरूजींच्या रुपाने बळावला आहे. असू गौरवउदगार डि.पी.सावंत यांनी अध्यक्षीय भाषणातुन उल्लेख केले.प्रस्ताविता मध्ये  व्यंकटराव कवळे पाटील कवळे बिगर शेती पतसंस्थेतील भागभांडवल, ठेवी,आधी सर्व माहिती व्यवस्थापक एन.व्ही हिंगोले यांनी केले.यांच्यासह जिल्ह्यातील पतसंस्थेचे  संचालक,सभासद,ग्राहक,व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सुञसंचलन मनुरकर तर अभार उमाजी नादरे यांनी केले.उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी व सौ. सागरबाई कवळे यांचा सन्मान करताना माजी मंञी डि.पी.सावंत, संजीव कुलकर्णी,आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment