स्वराज्य पोलीस मिञ संघटनाच्या वतीने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या वर कडक शासन करण्याची मागणी - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, August 2, 2021

स्वराज्य पोलीस मिञ संघटनाच्या वतीने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या वर कडक शासन करण्याची मागणी

स्वराज्य पोलीस मिञ संघटनाच्या वतीने अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या वर कडक शासन करण्याची मागणी

फलटण:- झिरपवाडी तालुका-फलटण जिल्हा. सातारा येथील अल्पवयीन दोन मुलींवर बलात्कार करणारा नराधम संशयित आरोपी धनंजय बाजीराव गायकवाड याला कडक शासन करून फाशीची शिक्षा द्यावी.
      झिरपवाडी ता.फलटण जि. सातारा येथील दोन अल्पवयीन मुलीना भेळ खायला देतो असे अमिष दाखवून त्याच्यावर आळापिळीने बलात्कार करणाऱ्या नराधम धनंजय बाजीराव गायकवाड यांने वय वर्षे   4 व वय वर्ष 7 एवढ्या निष्पाप मुलींवर बलात्कार केला असून आणि मुलींना घरी काय सांगायचे नाही नाहीतर जिवे मारून टाकेल अशी धमकी देण्यात आली. तसेच दुसर्‍या दिवशी मुलीने आपल्या आईला हे कृत्य सांगितल्यावर मुलीच्या आईने ताबडतोब फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून नराधमाला तुरूंगात बंद केले आहे.
  तरी *स्वराज्य  पोलिस मिञ संघटना बारामती शाखेतील पदाधिकारी* यांच्या माध्यमातून हे निवेदन फलटण उपविभागीय पोलीस तानाजी बरडे साहेब व फलटण तहसीलदार समिर यादव आणि बारामती तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आले तरी आरोपिला लवकरात लवकर पुढील कारवाई करून फाशीची शिक्षा द्यावी असे आव्हान करत आहोत....
यावेळी उपस्थित पुणे जिल्हा उपाध्यक्षा चांदणी दळवी मॅडम बारामती अध्यक्षा नेहा पवार 
बारामती उपाध्यक्षा ज्योती घोरपडे
बारामती सहसंघटक अंकिता खैरे 
बारामती संघटक मोनाली मासाळ
   तसेच राणी मासाळ स्नेहा घोलप, काजल मोरे , प्राजक्ता मोरे,सिंधू तुरकुंडे, सायली गायकवाड,आरती सावंत, शुभांगी कुंभार , सरोज लोणकर इत्यादी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment