अकलूज प्रांत कार्यालयावर दलित संघटनांचा ऐतिहासिक मोर्चा..
अत्याचार झाल्यास मतभेद विसरून एकत्रित प्रतिकार करणे या अकलूज पॅटर्नची महाराष्ट्रभर चर्चा
अकलूज(प्रतिनिधी):- बोरगाव-माळेवाडी ता.माळशिरस येथील मातंग समाजबांधवाचे प्रेत स्मशानभूमित जाळण्यासाठी मज्जाव करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई होण्यासाठी अकलूज प्रांत कार्यालयावर तालुक्यातील सर्व पक्ष व सर्व संघटना एकत्र येऊन मोर्चा काढण्यात आला.
या ऐतिहासिक मोर्चासंदर्भात नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस चे राज्य सचिव वैभव गिते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना खालील विश्लेषण व माहिती दिली
*मोर्चाची वैशिष्ट्ये*
1) महापुरुषांच्या घोषणांनी अकलूज व परिसर दुमदुमून गेला
2) सर्व पक्ष व संस्था-संघटना एकत्र
3) डॉ.बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व वंदन करून मोर्चा सुरवातीपासून ते शेवटपर्यंत शिस्तबद्ध पध्दतीने संपन्न झाला.
4) वेगवेगळ्या जिल्ह्यातून,तालुक्यातून चळवळीतील मात्तबर नेते व कार्यकर्त्यांची उपस्थिती
5) अकलूज शहरातून मोर्चा जातेवेळी सामान्य नागरिकास त्रास होणार नाही याची सर्व समनवयकांनी घेतलेली जबाबदारी पूर्ण केली.
5)बौद्ध,मातंग,चर्मकार, होलार या समाजासह बहुजन बांधवांची मोर्चास उपस्थिती व पाठिंबा
6) जुने व पारंपरिक वाद मतभेद विसरून प्रत्येक गटातटाचा नेता व कार्यकर्ता पीडित साठे कुटुंबास न्याय मिळवुन देण्यासाठी एकत्र झाला
7) प्रत्येकाच्या डोळ्यात बोरगाव-माळेवाडी च्या घटनेचा राग व चीड दिसत होती
8) 4 तास कडक उन्हात निषेध सभा होऊन सुद्धा एकही माणूस जागचा हलला सुद्धा नाही
9) पीडित साठे कुटुंबास शेवटपर्यंत साथ देण्याचा ठराव झाला
10) युवा तरुण व जेष्ठ नेत्यांचा सहभाग
11) भाषणे आक्रमक परंतु भाषा संविधानिक होती
12) पीडित साठे परिवाराच्या हस्ते प्रांताधिकारी अकलूज यांना वीस मागण्यांचे निवेदन सादर
13) सर्व दलितांनी एकत्र येऊन हातात हात घालून मोर्चा काढण्याची 25 वर्षात पहिलीच ऐतिहासिक घटना
सोलापुर जिल्ह्य़ातील माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव येथे मातंग समाजातील समाजबांधवाचे प्रेत स्मशानभुमी मध्ये दहन करण्यास मज्जाव करण्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला, त्यानंतर सबंध महाराष्ट्रात असंतोषाची आणि संतापाची लाट उसळली.अनेक पक्ष ,संघटनांनी सदर प्रकरणाबाबत गावभेटी देऊन पीडित साठे कुटुंबियांशी चर्चा केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे.तसेच व्हायरल झालेल्या व्हिडीओ मधून सुद्धा साठे कुटुंबियांवर अनन्वित अत्याचार झाल्याचे दिसून येते विमल सुरेश साठे यांनी अकलूज पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद दिल्याने अकलूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा.रजी.नंबर 0656/2021 नुसार भा.द.वि.341,143,147,149,504,506,
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नियम 1995 संशोधित अधिनियम 2015 कलम 3 (1) s,3(1)za, कलमानुसार गुन्हा दाखल आहे.तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज हे करीत आहेत.राज्यातील व जिल्ह्य़ातील सर्व पक्षाच्या आणि संस्था संघटनेच्या
=======मागण्या========
1 ) बोरगाव-माळेवाडी प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
2) पीडित कुटुंबियांचे जबाब,तपास टिपणे त्यांच्या म्हणण्यानुसार घेण्यात यावेत.
3) फिर्यादीचा पुरवणी जबाब फिर्यादी सांगेल त्या भाषेचे तात्काळ घेण्यात यावा.
4) गुन्ह्याचा तपास अकलूक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून तपास काढून अन्य कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात यावावा.तसेच अप्पर जिल्हा दंडाधिकारी सोलापूर व अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण 22 आगस्ट 2021 रोजी घटनास्थळी भेट देऊन वस्तुस्थिती दर्शक अहवाल जिल्हाधिकारी सोलापूर यांना पाठवला आहे.या अहवालाची प्रत फिर्यादी व फिर्यादीस मदत करणाऱ्या संस्था संघटनांच्या प्रतिनिधी यांना देण्यात यावी.
5) या गुन्ह्यातील फिर्यादी व साक्षीदार यांना खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात यावे.
6) माळेवाडी-बोरगाव ता.माळशिरस या गावात तीन एट्रॉसिटी चे गुन्हे दाखल असल्याने अत्याचार प्रवनक्षेत्र घोषित करावे.याच गावात पुन्हा साठे कुटुंबावर अत्याचार होणार नाही याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी.
7) माळेवाडी-बोरगाव मध्ये यापूर्वी एट्रोसिटी गुन्ह्यात आरोपी असलेल्या सर्वांचे जामीन नामंजूर करण्यासाठी मा.उच्च न्यायालयात अपील दाखल करावे.
8) सदर गुन्ह्यातील दोषारोपपत्रात कोणत्याही प्रकारची त्रुटी ठेवू नये तसेच वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी
9 ) कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या व स्थानिक वादांची माहिती तालुका दंडाधिकारी व प्रांताधिकारी यांना न पुरवणाऱ्या माळेगाव-बोरगाव आरोपी पोलीस पाटील यास तात्काळ बडतर्फ करावे.
10) स्मशानभूमी ते माळेवाडी बोरगाव पर्यंतचा रस्ता 15 दिवसांत करावा.
11) पीडित साठे कुटुंब राहत असलेल्या घरापासून ते मेन रस्त्यापर्यंत अधिकृत रस्ता मिळावा.
12) प्रांताधिकारी,तहसीलदार, पोलीस विभाग व संस्था संघटनांची शांतता व समन्वय संयुक्त बैठक माळेवाडी-बोरगाव गावात घेऊन यापुढे अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
13) पिडीत कुटुंबीयांना समाज कल्याण खात्याकडून 5 लाखाचा धनादेश देण्यात यावा.
13) पिडीत कुटुंबीयांवर मयताचे विडंबन केले असे भासवून गुन्हा दाखल केलेला आहे तो त्वरित मागे घेण्यात यावे.
14) घटनास्थळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक (नागरी हक्क संरक्षण) कोल्हापूर परीक्षेत्र यांनी भेट देऊन तातडीची मदत देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
15) पीडित साठे कुटुंबियांचे संपुर्ण पुनर्वसन करण्यात यावे.
16) कारुंडे ता.माळशिरस या गावात होलार समाजातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या आररोपीस अद्याप अटक झालेली नाही या आरोपीस तात्काळ अटक करावी
17) मिरे ता.माळशिरस गावात दाखल एट्रॉसिटी मधील आरोपी आडदांड व कायद्याला न जुमाणणारे असल्याने ते वारंवार अत्याचार करीत आहेत त्यामुळे त्यांना आरोपीना तडीपार करावे.
18) मुख्यमंत्री महोदयांच्या अंतर्गत असणारी राज्यस्तरीय दक्षता व नियंत्रण समितीची पुनर्ररचना करून बैठक घेण्यात यावी.
19) एट्रॉसिटीच्या अंमलबजावणी साठी मंत्रालयीन स्तरावर नोडल ऑफिसर ची नियुक्ती करावी
इत्यादी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
No comments:
Post a Comment