बारामती पोलिस ठाण्यात ४३लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, August 26, 2021

बारामती पोलिस ठाण्यात ४३लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

बारामती पोलिस ठाण्यात ४३लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल
बारामती :सद्या बारामतीत जमिनी  लुटण्याचा सपाटा चालू असून मग ती सावकारीकीतून    असो नाहीतर दमदाटी करून असो की, फसवणूक करून असो असाच एक किस्सा घडला असून त्याची तक्रार दाखल आहे,      गडदरवाडी (ता. बारामती) गावच्या हद्दीतील ७२ गुंठे जमिनीच्या व्यवहारात ज्येष्ठाची ४३लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक विठ्ठल महानवर (रा. खंडोबाचीवाडी,बारामती), दिलीप विठ्ठल टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी,पणदरे, ता. बारामती) व राहूल जगन्नाथ वाकुडे (रा.माळेगाव, ता. बारामती) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत
विजय अनंतराव सावंत (रा. वसंतनगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
मार्च २०१९ मध्ये टेंगले यांच्या ओळखीने गडदरवाडी येथील अशोकमहानवर यांची ७२गुंठे जमीन खरेदी करण्याचे फिर्यादीने ठरवले. हा व्यवहार १० लाख रुपयांना ठरला.यातील एक लाखाची रक्कम धनादेशाद्वारे महानवर यांचे मेहुणे टेंगले यांच्या नावे देण्यात आली, तर नऊ लाखांची रक्कम देण्यात आली. प्रत्यक्षात महानवर यांनी खरेदीखताने केवळ ३२ गुंठे जमीन दिली. जमिनीची नोंद लावण्यासाठी
फिर्यादी तलाठ्याकडे गेले असताना अशोक महानवर यांनी चुलते शिवाजी महानवर यांना पाच वर्षे मुदत खरेदीने ही जमीन यापूर्वीच दिली असल्याचे दिसून आले. याबाबत फिर्यादीने
विचारणा केली असता त्याने कबुली दिली. राहुल वाकुडे याने जमिनीची नोंद करून देतो असे आश्वासन फिर्यादीला दिले. प्रत्यक्षात नोंद करून दिलीच नाही.शिवाजी महानवर यांनी खरेदीखत उलटून देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्या व्यवहारातही फिर्यादीने ६ लाख रुपये भरले. परंतु या जमिनीवर दोन पतसंस्थांचा बोजा असल्याचे दिसून आले. तसेच अशोक याने खासगी देवस्थान ट्रस्टकडूनही या जमिनीवर पैसे घेतल्याचे दिसून आले. या नोंदी कमी करण्यासाठी फिर्यादीने ७ लाख ७५ हजार रुपये
दिले. पतसंस्थेचे कर्ज भरण्यासाठीही वेळोवेळी मोठ्या रकमा दिल्या. परंतु आरोपींनी पतसंस्थेचे कर्ज न भरता या रकमा स्वतःसाठीच वापरल्या.उरलेल्या क्षेत्राच्या खरेदीखतासाठी केवळ १ लाख ४७ हजार रुपयांचा सरकारी खर्च येत असताना त्यापोटी २ लाख ४५ हजार रुपये घेतले. याशिवाय वाकुडे याने २ लाख ५० हजार रुपये विश्वासाने घेत ते परत केले नाहीत. या प्रकरणात अशोक महानवर याने २७ लाख ४१ हजार, दिलीप टेंगले याने १ लाख, तर राहुल वाकुडे याने १५ लाख १८ हजारांची रक्कम घेत फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत
म्हटले आहे.

No comments:

Post a Comment