सावकाराने व्याजाच्या पैशासाठी बंदूकीच्या
धाकावर शरीर सुखाची मागणी करत केला बलात्कार..
पुणे:- सावकाराचे प्रस्थ वाढत असताना सावकार व्याजाच्या पैशासाठी वाटेल ते करायला मागे पुढे पाहत नाही,अशीच एक घटना नुकतीच घडली व्याजाने घेतलेल्या पैशांच्या व्याजाच्या मोबदल्यात पुण्यातील एका 26 वर्षीय महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली.याबाबत महिलेने खासगी सावकारान बंदुकीचा धाक दाखवून बलात्कार केल्याची तक्रार देताच तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हा प्रकार मागील पाच महिन्यापासून सुरु होता.आरोपीने दिल्ली,पठाणकोठ, अमृतसर, सुरत अशा विविध ठिकाणी अत्याचार केला आहे.याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र आर्म अॅक्ट आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.सावकारी कायदा अशा विविध ठिकाणी अत्याचार केला आहे.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध खासगी सावकार किरण रंभाजी घारे (वय-40 रा. बेबडओहळ ता. मावळ), दिपक प्रकाशचंद्र ओसवाल (वय-46 रा. शांतीनाथ सोसायटी,वतन नगर, तळेगाव स्टेशन, ता. मावळ)यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी 26 वर्षीय महिलेने फिर्याद दिली
आहे. आरोपीने पीडित महिलेवर बलात्कार
करुन त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.
हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत
आरोपीने वारंवार अत्याचार केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ओसवाल याच्या ओळखीची होती.
त्यानेच घारे याच्याशी पीडितेशी ओळख करुन
दिली होती.दरम्यान, पीडितेने घारे याच्याकडून एक लाख रुपये व्याजानं घेतले होते.काही दिवसांनी पीडितेनं 50 हजार रुपयांचे दोन
चेक आरोपी घारेला दिले.परंतु आरोपीने व्याजाच्या पैशांच्या मोबदल्यात महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली. परंतु पीडित
महिलेने याला नकार दिला.यानंतर आरोपीनं महिलेच्या पतीला आणि मुलाला मारण्याची धमकी दिली.तसेच बंदुकीचा धाक दाखवत पीडितेला फॉरच्यूनर गाडीत बसवलं.
त्यानंतर आरोपीने महिलेला दिल्ली, पठाणकोट,
अमृतसर आणि सुरत अशा विविध ठिकाणी नेत
तिच्यावर अत्याचार केले.दरम्यान आरोपीने मोबाईलमध्ये चित्रीकरण करुन तिला ब्लॅकमेल करत पीडितेवर वारंवार अत्याचार केले.तसेच कोठेही तक्रार केली तर माझे कुणी वाकडे
करु शकत नाही, अशी धमकी दिली.आरोपीने मार्च ते ऑगस्ट पर्यंत पीडितेवर
वारंवार अत्याचार केला आहे.पीड़ितीने आरोपीच्या सततच्या त्रासाला वैतागून
पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment