नोंदी साठी 3 हजाराच्या लाचेची मागणी, तलाठी ACB च्या जाळ्यात...
सातारा:- वडिलोपार्जित शेत जमीनीमध्ये वारसनोंद करुन उतारा देण्यासाठी 3 हजार रुपये लाच मागून 2 हजार रुपये लाच स्विकारणाच्या तलाठ्याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विभागाच्या
अधिकार्यांनी ही कारवाई बुधवारी (दि.1 ) वरकुटे-म्हसवड तलाठी कार्यालयात केली.
दादासो अनिल नरळे (वय-37 रा. पाणवण, ता. माण, जि. सातारा)असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या )तलाठ्याचे नाव आहे.
सापळा रचून याप्रकरणी 21 वर्षीय तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे.या जमीनीमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या बहिणीचे वारसदार म्हणून नाव नोंदवायचे होते.वारसदार नोंदणी करुन उतारा देण्यासाठी तलाठी दादासो नरळे याने तीन हजार रुपयाची लाच मागितली.तडजोडीमध्ये दोन हजार रुपये देण्याचे ठरले होते.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचुन तलाठी नरळे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले.ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव नाडगौडा,सुहास यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपधीक्षक अशोक शिर्के, पोलीस नाईक विनोद
राजे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी काटकर, तुषार
भोसले, निलेश येवले यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment