प्रांत कार्यालयात जमीन विकण्याची परवानगी देण्यासाठी लघुलेखकाने 3 हजारांची लाच मागितली!
अमरावती:- कोरोनाच्या महामारीने मेटाकुटीस आलेला जीव यांच्यामुळे परेशान झालेली जनता आणि वरून शासकीय दरबारी होत असलेली पिळवणूक, टक्केवारी, लाच मागणीने अवस्था हैराण झाली असल्याचे संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच अशीच एक घटना घडली नुकताच विदर्भातील पिचलेल्या शेतकर्यांपुढे
निर्ढावलेले प्रशासन असा एक अघोषित संघर्ष सुरू असून, आत्महत्याग्रस्त विदर्भात लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणारे प्रशासकीय अधिकारी कमी नाहीत. आज देखील मेहकर येथील उपविभागीय कार्यालयातील मिलिंदकुमार सुदाम वाठोरे या लघुलेखकास तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. महिला शेतकर्याने वेणी गाव येथील
शिवारातील त्यांच्या नावावर असलेल्या शेतापैकी अर्धा एकर शेत जमीन विक्री करण्यासाठी परवानगी मागितली होती.त्याचा आदेश देण्यासाठी वाठोरे यांनी सात हजार रुपयांची लाच मागितली. यावरून संबंधित महिला शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे कार्यालय गाठले.तेथे पड़ताळणी केले असता वाठोरे हा लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला. यामध्ये सात हजार रुपयांची लाच
मागितली होती. तडजोडीअंती तीन हजार
रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना वाठोरे
यास प्रांताधिकारी कार्यालय मेहकर या
कार्यालयात रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अमरावती परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलीस नाईक विलास साखरे, मोहम्मद रिजवान, विनोद लोखंडे, जगदीश पवार, नितीन शेटे यांच्या पथकाने केली.
No comments:
Post a Comment