चोरीचे तीन गुन्हे उघडकीस 528000 रुपये किंमतीचे मुद्देमालासह चार आरोपीना पकडण्यात यश: स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण ची कामगिरी बारामती:- दि 03/09/2021 रोजी सकाळी 10 वाजणे पूर्वीं मोजे शिरवली ता.बारामती येथील नीरा नदीचे बंधाऱ्याचे एकूण 26 बर्गे किंमत रुपये 36000 चे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले बाबत गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्यातील मुद्देमाल हा शेतकऱ्याचा शेती शिंचनाच्या प्रश्नाशी निगडित असल्याने मा.पोलीस अधीक्षक, डॉ. श्री.अभिनव देशमुख साो. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना सदर गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करणे बाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दि.9/9/2021 रोजी सांगवी ता.बारामती भागात पेट्रोलिंग करीत असताना एक बलेरो पिकअप संशयावरून ताब्यात घेतली व त्यातील दोन संशयित इसमास ताब्यात घेऊन त्यांचेकडे तपास केला असता त्यांनी त्यांचे शिरवली ता बारामती येथील एका साथीदाराच्या मदतीने सदरचे गुन्हे केले असून त्यातील मुद्देमाल हा कोंढवा पुणे येथील भंगरवाल्यास विकला असलेबाबत सांगितले वरून त्या ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात गेला माल व गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप असा एकूण 5,28,000 रु.किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला असून सदर गुन्ह्याचे कामी
1) युवराज आप्पाजी जगताप वय 48
रा.सासवड ता पुरंदर जि पुणे,
2) सत्यवान सर्जेराव सोनवणे वय 40
रा सोनोरी ता,पुरंदर जि पुणे
3 ) प्रमोद अरविंद खरात वय 26 रा
शिरवली ता बारामती जि पुणे
4) कादर कासीम शेख वय 49 निसर्ग
हाईट 3 रा मजला प्लॅट नं,7 रा
मार्केटयाड पुणे यांना अटक केली
असून त्यांनी
1) बारामती तालुका गु,र,नं
531/2021 भा,द,वि,क,379
2) 538/2021 भा,द,वि,क,379
3) 494/2021 भा,द,वि,क,379 सदरचे गुन्हे केल्याबाबत कबुली दिली आहे, तरी त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी बारामती तालुका पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.सदरची कारवाई
मा. पोलीस अधीक्षक, डॉ. श्री अभिनव देशमुख सो, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मिलिंद मोहिते,सो बारामती विभाग उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर सो. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे
पोलीस निरीक्षक श्री अशोक शेळके,
पोलिस निरीक्षक श्री महेश ढवान
पो,स,ई, श्री अमोल गोरे
पो,स,ई,श्री शिवाजी ननावरे
पो हवा. अनिल काळे,
पो. हवा. रविराज कोकरे,
पो.हवा.बाळासाहेब कारंडे,
पो.ना. अभिजीत एकशिंगे,
पो.ना.स्वप्निल अहिवळे
चालक सहा.फौज. काशिनाथ राजापुरे
यांनी केली आहे,
No comments:
Post a Comment