राज्यातील वाढत्या बलात्काराच्या निषेधार्थ रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा-संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, September 11, 2021

राज्यातील वाढत्या बलात्काराच्या निषेधार्थ रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा-संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण...

राज्यातील वाढत्या बलात्काराच्या निषेधार्थ रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा-संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण... 
पुणे:- मा. पोलीस आयुक्त पुणे शहर पोलीस पुणे शहर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस ठाणे पुणे शहर यांना नुकताच निवेदन देण्यात आले,राज्यातील वाढत्या बलात्काराच्या निषेधार्थ तीव्र रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा या निवेदानाद्वारे देण्यात आला,रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने हे निवेदन दिले, पुणे, पिंपरी,ठाणे , मुंबई या सर्वच महानगरांमध्ये स्त्रिया आणि मुली सुरक्षित नाहीत. गेल्याच आठवड्यात पुण्यातील दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गतिमंद मुलीवर चौघांनी केलेला बलात्कार, पिंपरी येथे वडिलांनी मुलीवर केलेला बलात्कार, साकिनाका, मुंबई येथील महिलेवर अत्याचार केल्यानंतर तिच्यावर चाकूने वार केले आणि तिच्या **** रॉड खूपसून तिला भयंकर गंभीर जखमी केले.पुणे स्टेशन येथील सहा वर्षांच्या मुलीवर रिक्षाचालकाने मार्केट यार्ड येथे पडक्या इमारती मध्ये नेऊन पहाटेच्या सुमारास बलात्कार केला. पुणे स्टेशन जवळ परप्रांतीय असणाऱ्या चौदा वर्षांच्या मुलीवर सहा जणांनी केलेल्या सामूहिक बलात्कारांतर अवघ्या राज्याची मान खाली गेली आहे. जर राज्यातील प्रमुख महानगरांची परिस्थिती स्त्रियांसाठी इतकी असुरक्षित असेल, तर राज्याच्या ग्रामीण आणि खेड्यातील परिस्थितीमध्ये अशा घडून गेलेल्या घटना वाच्यताही होत नसेल? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो. आज प्रत्येकाच्या घरात असलेल्या स्त्रीला घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. २ वर्षाच्या मुली पासून ते ८० वर्षाच्या आजी पर्यंत कोणतीही स्त्री सुरक्षित नाही. स्त्रियांचे अपहरण करणे, त्यांच्यावर आळीपाळीने सामुहिक बलात्कार करणे, त्यांना वेदनादायी मारहाण करणे, गंभीर जखमी करणे, खून करण्याच्या उद्देशाने जखमी करणे अशा घटना दर दिवशी मोठ्या संख्येने पाहायला मिळत असताना या राज्यातील स्त्रिया असुरक्षित आहेत, याची प्रकर्षाने जाणीव होते. एकेकाळी मध्यरात्री पुणे मुंबईच्या रस्त्यावर सुरक्षितपणे वावरनाऱ्या स्त्रियांच्या मनात या सर्व घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशा घटनांना वेळीच पायबंद बसून निर्भयतेने मुलींना समाजात वावरता यावे, याचसाठी आम्ही रुग्ण हक्क परिषद पुणे शहर आणि पुणे जिल्हा कमिटीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता ज्योती रेस्टॉरंट समोर, कोंढवा मुख्य रस्त्यावर तीव्र रस्ता रोको आंदोलन करून या सर्व घटनांचा निषेध नोंदविणार आहोत. असे अल्ताफभाई तारकश (पुणे जिल्हा अध्यक्ष),डॉ. सलीम आळतेकर( संपर्कप्रमुख, महाराष्ट्र प्रदेश),मा. अपर्णाताई साठे(पुणे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी),मा. सलीम पटेकरी
(समन्वयक रुग्ण हक्क परिषद),मा. वनिता पंडित ( संपर्कप्रमुख, पुणे शहर),डॉ. किशोर चिपोळे(संचालक, आरएचपी हॉस्पिटल) यांच्या मार्फत देण्यात आले.

No comments:

Post a Comment