बारामती इंदापूर तालुक्यातील औषध विक्री दुकानांची कारवाई प्रक्रिया सुरू पुणे:- कोरोणाच्या कालावधीमध्ये औषध विक्री दुकाने पूर्ण वेळ चालू ठेवण्यास परवानगी दिली होती परंतु या महामारीच्या कालावधीमध्ये काही औषध विक्रेत्यांनी चांगल्या प्रकारे सेवा दिल्या परंतु काहींनी याचा गैरफायदा घेतला आणि ग्राहकांची लूट देखील केली. विशेष म्हणजे काही औषध दुकानात रेडिमेड कपडेच मिळणे बाकी होतं..!! याबाबत पुणे जिल्ह्यातील सर्व दुकानांची तपासणी करण्याबाबत मी जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत विषय मांडला होता त्यानुसार सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी तपासणी करून दिलेल्या तपासणी अहवालानुसार पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील महानगरपालिका क्षेत्र वगळून एकूण 2374 औषध विक्री दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी,316 दुकान यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली.174 औषध दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले.32 दुकानांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला.57 औषध विक्री दुकानांची कारवाई प्रक्रिया सुरू असे आहे.यामध्ये यामध्ये बारामती व इंदापूर तालुक्यातील 6 मेडिकल दुकानांचे परवाना निलंबित केले असून,एक मेडिकल कायमस्वरूपी रद्द केले आहे 7 मेडिकलची कारवाई अंतिम टप्प्यामध्ये आहे अशी माहिती तुषार झेंडे पाटील,
राज्य ग्राहक संरक्षण परिषद यांनी दिली.
No comments:
Post a Comment