१६ किलो अमली पदार्थ ( गांजा )वाहतुक करणारे अटकेत,एकूण ३,०६,०००/- रूपये किंमतीना माल जप्त - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, September 19, 2021

१६ किलो अमली पदार्थ ( गांजा )वाहतुक करणारे अटकेत,एकूण ३,०६,०००/- रूपये किंमतीना माल जप्त

१६ किलो अमली पदार्थ ( गांजा )वाहतुक करणारे अटकेत,एकूण   ३,०६,०००/- रूपये किंमतीना माल जप्त                                           भिगवण:- भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी, १६ किलो अमली पदार्थ ( गांजा )वाहतुक करणारे अटकेत मा. डॉ.अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी गणेश उत्सवाचे अनुशंगाने सतर्क पेट्रोलींग करणे व रेकॉर्डवरील गुन्हेगार हृददपार करणे अशा प्रकाराच्या सुचना दिल्या होत्या त्या अनुशंगाने आज दिनांक. १९/०९/२०२१ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त झाली की,
मौजे भिगवण गावचे हददीत जुना भिगवण राशिन रोडने राशिन बाजुकडून एका मोटार सायकल वरून दोन इसम आपले कब्जात बेकायदेशीर गांजा घेवून जाणार आहेत अशी बातमी मिळाल्याने भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा. दिलीप, पवार, सहा पोलीस निरीक्षक , विनायक दडस पाटील,पोलीस उपनिरीक्षक यांनी तात्काळ मदतीस पोलीस स्टाफ घेवुन दुपारी २:४० वा चे सुमारास भिगवण गावचे हददीत जुना भिगवण राशिन रोड याठिकाणी सापळा रचुन एका मोटार सायकलवर दोन इसम पांढरया गोणीमध्ये काहीतरी घेवून येताना दिसले. मोटार सायकल स्वार यांना पोलीसांनी थांबविण्याचा इशारा केला असता त्यातील एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला.शिताफीने त्याचा दुसर्या साथीदार नामे अशोक शिवदास पवार, वय २१ वर्ष रा.वांगी, ता भुम, जि.उस्मानाबाद यास मुददेमालासह ताब्यात घेतले. त्याचे ताब्यातुन १६ किलो वजनाचे गांजा सह एक होंडा शाईन मोटार सायकल असा एकुण ३,०६,०००/- रूपये किंमतीना माल जप्त करण्यात आला आहे
सदर बाबत भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा.रजि नंबर. २२९/२०२१ , गुंगीकारक औषधी द्रव्य
मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम :१९८५ चे कलम८(क), २०क) अन्वये गुन्हा दाख্ल पोलीसांनी करण्यात आला असुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे.सदरची कामगिरी ही मा. डॉ.अभिनव देशमुख , पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते , अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण, मा. नारायण शिरगावकर,उपविभागीय पोलीस अधीकारी, बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मा.दिलीप पवार , सहा पोलीस,निरीक्षक, मा. विनायक दंडस पाटील, पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार साईराम भिसे, नवनाथ भागवत, सचिन पवार, महेश उगले, केशव चौधर, आप्पा भांडवलकर, होमगार्ड धुमाळ, सुर्यवंशी यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment