राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी च्या रुई येथील कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 2, 2021

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी च्या रुई येथील कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या नगरपरिषदेसमोर राष्ट्रवादी च्या रुई येथील कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण                           बारामती:-  रूई बयाजीनगर ता.बारामती जि.पुणे दिनांक ३०/८/२०२१ रोजी. प्रांत अधिकारी बारामती यांना निवेदन देण्यात आले, बयाजी नगर (रूई प्रभाग ४) मधील अपुर्ण ड्रेनेज लाईन गेले ४ वर्ष पुर्ण न झाल्यामुळे अमरण उपोषण करत असल्याबाबत व त्यानुसंगाने दि . २/९ /२०२१ वार गुरूवार सकाळी १० वा समस्त ग्रामस्थ बयाजी नगर रूई येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे कार्यकर्ता यांनी आमरण उपोषणाला बसले असून आम्ही गेले २५ वर्षापासुन बयाजीनगर रूई येथे रहिवाशी आहोत ,आम्ही गेल्या ४ वर्षापासुन बारामती नगरपालिका व प्रशासनास पाठपुरवठा करून सुध्दा आमची ड्रेनेज लाईन मेन ड्रेनेज लाईनला जोडली गेली नाही घराभोवती सर्व ड्रेनेजचे खराब पाणी
साठलेले आहे . त्यामुळे आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे .आमचे सर्व ड्रेनेज पाणी उघडयावर साठलेले असते . ते आम्ही मागील अर्जामध्ये आपणास फोटोदवारे व प्रत्यक्षात दाखवुन सर्व परिस्थिती लक्षात आणुन दिलेली आहे . तरी सुद्धा आमचा प्रश्न मार्गी
लागला नाही . त्यामुळे आम्ही दिनांक 0२/0९/२०२१ वार गुरूवारी बारामती नगर पालिकेसमोर सकाळी १० वाजता उपोषणास बसलो असून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार असल्याचे सांगण्यात आले यावेळी रुई येथील ग्रामस्थ राहुल सोने,सुरेखा कराळे,सुवर्णा कराळे, कौशल्या घुमरे,यमुना करदुले,गीतांजली राऊत, संगीता खोमणे,मेगा नेने, राजश्री चव्हाण,योगिता सोने,संगीता थोरात, सुमल सकट सह अनेक महिला उपोषणाला बसल्या होत्या अनेक दिवसाची मागणी असून देखील यामागणीकडे लक्ष का दिले जात नाही असेही यावेळी शंका उपस्थित केली गेली, बारामती नगर परिषदेमध्ये एकहाती राष्ट्रवादीची सत्ता असताना चक्क राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्यांना आमरण उपोषण करावे लागते हा चर्चचा विषय बारामतीत होताना दिसला, नक्की नगरपरिषद कोण चालवितो ,बारामती नगरपरिषदेला अनेक दिवसापासून मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांची होत असलेली तारांबळ व दोन गटबाजी असल्याने होत असलेली हेळसांड हा एक नगरपरिषद मध्ये चांगलाच चर्चिला जात आहे.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रत्येक प्रभागातून नगरसेवक दिले खरे पण कामे का होत नाही हा प्रश्न नागरिकांना पडला आहे तर दुसरीकडे खाजगीत नगरसेवक बोलताना सांगतात की आम्ही निवडून आलो असलो तरी कामे मात्र फक्त दोन नगरसेवकांची होतात जो यांच्या गटात आहे त्याची कामे होतात मग नाईलाजाने आम्हाला यांच्या गटात राहावे लागते अशी नाराजी व्यक्त करताना कळते.याबाबत लवकरच प्रत्येक प्रभागातील लेखजोगा प्रसिद्ध करणार असून नागरिकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करणार आहोत.

No comments:

Post a Comment