साथीच्या रोगांपासून बचावासाठी स्वच्छता करून जंतुनाशक फवारणी करुन उपाययोजना राबवा- मंगलदास निकाळजे
बारामती:- बारामती शहरामध्ये गेले
कित्येक दिवसांपासून साथीचे रोग (डेब्यू, मलेरीया, चिकनगुन्या, गोचिड ताए, निमोनीया,
वायरल इन्फेक्शन व इतर अशा प्रकारच्या) साथीच्या रोगांचे प्रमाण वाढत आहे कित्येक लोक आजारी पडत आहे, कोरोनाच्या काळामध्ये अशाप्रकारचे रोग मोठयाप्रमाण वाढत असल्याने
लोकांमध्ये भितीचे वातावरण वाढले आहे शहरामधील विशेष करून अनुसुचित जाती, जमातीतील लोक राहत असणाऱ्या वस्त्यांमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे या साथीच्या रोगांचे प्रमाण खुप वाढत आहे. त्यामुळे आपण याकडे लक्ष देवून बारामती शहर तसेच बारामती मधील अनुसुचित जाती जमातीतील वस्त्यांमधील कचरा साठणारी सर्व ठिकाणे वारंवार स्वच्छता करून तसेच या ठिकाणावरील सार्वजनिक संडासे स्वच्छ करून, जंतूनाशक फवारणी , बेशीपावडर मारणे,धुर फवारणी, व अशाप्रकारच्या जंतूनाशक फवारणी करून
त्याबाबतच्या सर्व उपाय योजना लवकरात लवकर राबवाव्यात अशा मागणीचे पत्र वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे यांनी मुख्याधिकारी व आरोग्य निरीक्षक बारामती नगर परिषद यांना दिले.
No comments:
Post a Comment