डॉक्टरांनी शब्द पाळला!कोवेड रुग्णांच्या मृत्यूनंतर बिल घेण्यास नकार...
केडगाव प्रतिनिधी :नवनाथ खोपडे : कोरोनामुळे सुमारे 17-18 दिवस अतिदक्षता विभागात औषध उपचार घेत असताना दोन रुग्ण दगावले. मात्र, केडगाव (ता. दौंड ) येथील डॉ. सचिन भांडवलकर यांनी आधीच जाहीर केल्यानुसार बिलाचे पैसे घेतले नाही. बोलल्या नुसार शब्द पाळल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केली. खाजगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्युनंतर बिलासाठी पार्थिव दडवून ठेवतात, असा अनुभव अनेकदा सांगितला जातो. या पार्श्वभूमीवर डॉ. भांडवलकर यांचे वेगळेपण आहे. गेल्या पंधरवड्यात बारामती तालुक्याच्या सुपे परिसरातील साठी-सत्तरी पार केलेले दोन रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आमचा औषधांसाठी खर्च झाला. मात्र, रुग्णालयाच्या मिळालेल्या सुविधेचा कसलाही खर्च डॉक्टरांनी मागितला नाही. आज काल पैसे कोण सोडत नाही. आमचा प्रत्येकी सुमारे सव्वा लाखाचा खर्च वाचल्याची माहिती मृत रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.
याबाबत डॉ. भांडवलकर म्हणाले, "आत्तापर्यंत सुमारे दोन हजार रुग्णांवर उपचार केले त्यापैकी 22 रुग्ण दगावले, याचे वाईट वाटते. त्याचे बिल घेतले नाही. आपण मदत करू, त्याच्या अनेक पटीने देव देतो असा अनुभव आहे. आपले कर्तव्य आपण करत राहायचे".
No comments:
Post a Comment