बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पंतसंस्थेच्या सभासदांना वार्षिक १२ % लाभांश जाहिर - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 7, 2021

बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पंतसंस्थेच्या सभासदांना वार्षिक १२ % लाभांश जाहिर

बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पंतसंस्थेच्या सभासदांना वार्षिक १२ % लाभांश जाहिर 
बारामती:- बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेच्या मागील १२ वर्षापासुन संस्थेस ऑडीट वर्ग अ मिळालेला असून पतसंस्थेच्या सभासदांना ५,००,०००/- लाखावरून ७,५०,०००/- कर्ज मर्यादेमध्ये वाढ करण्यात आली तसेच व्याजाचा दर १२% वरून ९ % इतका करण्यात आलेला आहे. सर्वाधिक महाराष्ट्रातील ज्या नगरपरिषद पातळीवर पतसंस्था आहेत त्यामध्ये बारामती कामगार पतसंस्था ज्यास्त कर्ज देणारी व कमी व्याजदर घेणारी बारामती नगरपरिषद कामगार पतसंस्था अव्वल ठरणार आहे. असा ठराव सभासदांनी
सर्वानुमते मंजुर केलेला आहे. अशी माहिती कामगार पतसंस्थेचे चेअरमन श्री राजेंद्र सोनवणे
सचिव श्री. सुनिल धुमाळ यांनी दिली.
बारामती नगरपरिषद कामगार सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा
ऑनलाईन पध्दतीने पतसंस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार
दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी संपन्न झाली. यावेळी मोबाईल व्हीडीओ कॉन्फरन्स या
ऑनलाईन सभेकरिता संस्थेचे बहुतांश सभासदांनी आपला सहभाग नोंदवून सभा
खेळीमेळीच्या वातावरणात पारपाडण्यासाठी सभासदांनी सहकार्य केले. संचालक मंडळाने
संस्थेचा कारभार काटकसरीने करत सलग १२ वर्ष १२% व्याजदराने लाभांश देण्याचा एक
विक्रम केला आहे. १२ % प्रमाणे सभासदांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ लाभांश जमा
करण्यात आला आहे. श्री राजेंद्र सोनवणे म्हणाले की, संस्थेचे सर्वसमावेशकता, काटकसर,
पारदर्शकतेच्या जोरावर व सभासदांच्या पाठींब्याने स्वभांडवल व स्वबळावर गेल्या ८
वर्षापासून संस्थेने यशस्वी अशी वाटचाल केली आहे. बारामती नगरपरिषदेच्या कामगार
पतसंस्थेवर सहकारी बँक अथवा इतर कोणत्याही बँकेचे कोणतेही कर्ज नाही. संस्थेचे भाग
भांडवल २,५३,००,०००/- असून बँकेत १,४८,००,०००/- रूपये बचत खात्यामध्ये शिल्लक आहेत. संस्थेच्या संभासदांना अत्तापर्यंत संस्थेने ३,५७,००,०००/- रूपये इतके कर्ज वाटप
केलेले आहे. यंदाच्या वर्षी संस्थेला ४२ लाख नऊ हजार तिनशे त्रेसष्ठ रूपये इतका नफा
झाला असून दरवर्षी सभासदांना गृहपयोगी वस्तु भेट म्हणून देण्यात येतात. या वर्षी
सभासदांना ३५ स्टील भांड्यांचा सेट भेट स्वरूपात देण्यात येणार आहे. सभासदांचे त्यांच्या एपतीप्रमाणे रिकरींगची सुविधा चालू केलेली असल्याने त्याची रक्कम दिवाळी सणाकरिता देण्यात येते. तसेच सभासदांच्या घरातील आई ,वडील, पती, पत्नी मुलगा, मुलगी
आजारपणामुळे किंवा इतर कारणामुळे मयत झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना रक्कम रूपये १०,०००/-संस्थेच्या कामगार कल्याण निधितून संहानुभुती म्हणून आर्थिक मदत संस्थेच्या
वतीने दिली जाते.संस्थेचे प्रास्ताविक व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे चेअरमन श्री राजेंद्र सोनवणे यांनी दिली. तसेच विषय पत्रीका वाचन श्री सुनिल धुमाळ यांनी केले. या प्रसंगी व्हाईस
चेअरमन श्री राजु सुपेकर तसेच माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री देविदास साळुंके, श्री
अतुल बनकर, श्री. भालचंद्र ढमे, श्री अनिल शिंदे, श्री.. राजेंद्र शिंदे, श्री निलेश आहिवळे, श्री.
अरूण थोरात, श्री हनुमंत गायकवाड, श्री संजय गडियल, श्रीमती प्रतिभा सोनवणे, श्रीमती
सखु श्याम खरात लिपीक श्री अनिल गोंजारी उपस्थित होते. आभार श्री देविदास साळुंके
यांनी मानले अशी माहिती चेअरमन राजेंद्र सोनवणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment