मनसे नी प्रतीकात्मक दहीहंडी महाराष्ट्र शासनाचा निषेध करत फोडली - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 1, 2021

मनसे नी प्रतीकात्मक दहीहंडी महाराष्ट्र शासनाचा निषेध करत फोडली

बारामती:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज बारामती मध्ये महाराष्ट्र शासनाचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲडवोकेट विनोद जावळे यांनी बारामती पंचायत समिती चौक मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सालाबादप्रमाणे होणारी राज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव ही दहीहंडी आज रोजी प्रतीकात्मक महाराष्ट्र शासनाचा निषेध करत फोडली महाराष्ट्र शासनाला सर्व राजकीय कार्यक्रम चालतात मेळावे चालतात हिंदूंचे व मराठी बांधवांचे सन का चालत नाहीत या हिंदू विरोधी राज्य शासनाच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असून शासनाचा निषेध करत दहीहंडी फोडण्यात आलीआहे महाराष्ट्र शासनाची दडपशाही हुकूमशाही यापुढे कदापि खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्र शासन कोरोना ची तिसरी लाट येणार असल्याची भीती दाखवून   हिंदू सणा वरती निर्बंध लादत आहे महाराष्ट्र शासन  जनतेची दिशाभूल करत आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदूंचे सण मराठी बांधवांचे सण संपूर्ण महाराष्ट्रात इथून पुढे साजरी करतील महाराष्ट्र शासनाचा निषेध असो त्यावेळी उपस्थित मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते निलेश कदम तालुका व शहर संघटक बाबा सोनवणे , शहराध्यक्ष ऋषी पवार श्रीकांत रोकडे ,नितेश थोरात ,शिवदत्त, विजय ,सोमनाथ पवार, अक्षय काळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते व सरकारचा जाहीर निषेध केला

No comments:

Post a Comment