ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ बारामती तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब गायकवाड तर शहर अध्यक्ष पदी सुनील लोणारी यांची नियुक्ती... - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 7, 2021

ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ बारामती तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब गायकवाड तर शहर अध्यक्ष पदी सुनील लोणारी यांची नियुक्ती...

ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ बारामती तालुका अध्यक्ष पदी बाळासाहेब गायकवाड तर शहर अध्यक्ष पदी सुनील लोणारी यांची नियुक्ती...                                                                                                             बारामती:- वाहन चालक, मालक यांच्या सर्वागीण विकासासाठी काम करणारी संघ म्हणजे मान्यता प्राप्त असणाऱ्या ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघ भारत, वाहन चालक व मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यास महासंघाकडे इच्छा व्यक्त करणारी तमाम भारत व महाराष्ट्र राज्यातील चालक-मालक यांच्या न्याय हक्कासाठी व सामाजिक राजकीय, धार्मिक, श्रमिक
तसेच सर्वधर्म समभाव असे देशहितासाठी व विधायक कार्यामध्ये योगदान देण्यासाठी वाहन
चालक मालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यासाठी तसेच आपल्या महासंघाची कार्यकारिणी वाढविण्याचे कार्य करण्यासाठी लोक पुढे येत आहे याचं पार्श्वभूमीवर  दिनांक --7/9/2021.-रोजी ऑल इंडिया वाहन चालक मालक महासंघाच्या बारामती तालुका पदावर अनिल(बाळासाहेब)गायकवाड यांची तालुका अध्यक्ष व सुनील लोणारी यांची बारामती शहर अध्यक्ष पदावर  नियुक्ती करण्यात आली आहे,यावेळी आयोजित केलेल्या बैठकीत ही निवड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संताजी गायकवाड, काशिनाथ लेंगरे अध्यक्ष, संतोष जाधव संपर्क प्रमुख पुणे जिल्हा, अन्वर खान सचिव शहर, नंदकुमार बोराटे,कार्याध्यक्ष तालुका,परशुराम मोरे प्रवक्ता,केशव खंडाळे,सुरज विरकर सह पदाधिकारी उपस्थित होते ,ऑल इंडिया चालक-मालक महासंघ श्री. रमेश एस. समुखराव: संस्थापक अध्यक्ष भारत,नंदकुमार नामदास सचिव, महाराष्ट्र प्रदेश,श्री. अशोक ल. दराडे अध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश,राजेंद्र जगताप सहसचिव यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली, यावेळी अनेक विषयांवर चर्चा विनिमय करून चालक वर्गाला येणाऱ्या अडचणी कश्या येतात व त्यासाठी काय करावे याबाबत चर्चा करण्यात आली व लवकरच बारामती मध्ये अधिवेशन घेण्यात यावा अशी एकमताने मागणी झाली, या दरम्यान हॉटेल दुर्वा येथे प्रीतीभोजनाचा कार्यक्रम नव निर्वाचित तालुका अध्यक्ष बाळासाहेब(अनिल)गायकवाड यांनी आयोजित केला होता.

No comments:

Post a Comment