भोंदूबाबा मनोहर उर्फ मामा भोसले यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद...
बारामती:- दि.०९/०९/२०१८ रोजी बारामती तालुका पो.स्टे. गु.र.नं. ५३९/ २१ शादंविकाक.४२०,३८४,५०६,३४ सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुश, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटण प्रतिबंध व उच्चाटण कायदा २०१३ चे कलम ३ (२) औषधे व चमत्कारी उपयार ( अक्षेपार्ह जाहीरात)
अधिनियम व नियम १९५४ चे कलम ७ प्रमाणे मनोहर उर्फ मामा भोसले याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.सदर इसम नामे मनोहर उर्फ मामा भोसले हा लोकांचे भविष्य सांगून अडीअडचणी दूर करतो असे जनमानसात माहीती झाल्याने त्यांचेकडे विविध क्षेत्रातील मोठ मोठया व्यक्ती तसेच गंभीर गुन्हयातील
गुन्हेगार भविष्य जाणून घेप्यासाठी त्यांचेकडे जाणे येणे चालू झाले. त्यातुन त्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक माया जमविली होती. तसेच त्यांचे पुणे जिल्हयात व बाहेरील जिल्हयात त्यांची प्रसिध्दि झालेली होती. त्यामुळे गुन्हयाचे गंभीर्य लक्षात घेवून मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा. पोलीस
निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे आदेशान्वये सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेणेकामी स्थानिक गुन्हे शाखाच्या टीम तयार करण्यात आलेल्या होत्या.दिनांक १०/०९/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, सदर गुन्हयातील आरोपी नामे मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले हा सातारा जिल्हयातील लोणंद पोलीस स्टेशन हददीत सालपे गावात असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे बातमी मिळताच सदर
ठिकाणी जावून स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सापळा रचून पकडले त्यानंतर त्यांचेकडे त्यांचे नाव व पत्ता विचारले असता, त्यांने त्याचे नाव मनोहर उर्फ मामा भोसले, वय २७ वर्षे, रा.उंदरगाव, ता.करमाळा,असे सांगितले. सदर आरोपीस गुन्हयाचे पुढील तपासकामी बारामती तालुका पो.स्टे.ला हजर करण्यात आलेले आहे.
.जि.पुणे सदरची कारवाई ही मा.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मा.मिलींद मोहीते, अपर पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली मा.अशोक शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे आदेशान्चये खालील पथकाने केलेली आहे.
१, संदिप येळे, सहा,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण.२. राहूल घुगे, सहा.पोलीस निरीक्षक, बारामती तालुका, पोलीस स्टेशन.३. शिवाजी ननवरे, उप - पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण.
४. विजय कांचन, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण.५. अजय घुले, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रमीण.
६. राजु मोमीन, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण.७. धिरज जाधव, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण.
८. नंदू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल, बारामती तालुका, पोलीस स्टेशन.९. विजय वाघमोडे, पोलीस कॉन्स्टेबल, बारामती तालुका, पोलीस स्टेशन यांनी केली.
No comments:
Post a Comment