सिल्व्हर जुबली रुग्णालयाला डॉ. अशीष जळक यांनी ओमीनी दिली भेट
बारामती दि. 08:- बारामतीतील प्रसिध्द स्त्रीरोग तज्ञ अशीष जळक यांनी आपल्या पत्नी डॉ.प्रियंका जळक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 18 ऑगस्ट 2020 रोजी सिल्व्हर जुबली रुग्णालयाला चक्क ओमीनी गाडी भेट दिली.
आपल्या व्यवसायातून पैसा तर सर्वच जण मिळवतात, पंरतू डॉ. जळक यांच्यासारखी व्यक्ती आभावानेच आढळते. या गाडीमुळे कोविडच्या काळात रुग्णांना खुप मदत झाली होती. यावर्षी देखील त्यांनी गाडीचे सर्व्हिसिग करुन नवीन टायर बसवून गाडी हॉस्पिटलला पुन्हा सुपुर्द केली. यावेळी सिल्व्हर जुबली रुग्णालयातील डॉ. सदानंद काळे वैद्यकिय अधिक्षक यांनी सर्व स्टापच्यावतीने त्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे मदतीबदल आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment