*वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन येथे आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन*
वडगांव निंबाळकर:- पोलिस येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३० वी जयंती साजरी करण्यात आली.वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन येथिल सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री.सोमनाथ जी लांडे ,श्री.संभाजी नाना होळकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष बारामती तालुका तसेच पैलवान नानासाहेब मदने अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून राजेंना अभिवादन करण्यात आले.राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे ७ सप्टेंबर १७९१ रोजी झाला.वयाच्या दहाव्या वर्षी कुस्तीगीर म्हणुन त्यांचा लौकिक होता.ते कुशल धाडशी, शिस्त प्रिय संघटक होते त्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज होते.त्यांची प्रेरणा घेऊन त्यानी सैन्य जमवून प्रतिकार केला.इंग्रजांना हाकलुन लावण्यासाठी त्यांच्यावर तुटुन पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीकाराना बळ देणारे ठरले असे मत पोलिस निरीक्षक लांडे साहेब यानी यक्त केले.
यावेळी प्रमूख उपस्थिती बारामती तालुका अध्यक्ष हनुमंत खोमणे,शिवसेना विभाग प्रमुख निलेश मदने,जेष्ठ मार्गदर्शक बबन आण्णा भंडलकर,लालासो खोमणे,महेंद्र भंडलकर,पांडुरंग घळगे,संतोष भंडलकर,मुन्ना खोमणे,कौस्तुभ मदने,महेश खोमणे,संदिप भडलकर तसेच पोलिस स्टेशन चे सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आले होते.
सर्वांचे स्वागत पोलिस स्टेशन तर्फे करण्यात आले.प्रास्तविक हवालदार बाळासो खोमणे यांनी केले तर आभार हवालदार फणसे यांनी मानले.
No comments:
Post a Comment