भारतीय संविधान पायाजवळ ठेऊन संविधानाचा अपमान केलेल्या प्रतिनिधींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा...सचिन मोरे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 17, 2021

भारतीय संविधान पायाजवळ ठेऊन संविधानाचा अपमान केलेल्या प्रतिनिधींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा...सचिन मोरे

भारतीय संविधान पायाजवळ ठेऊन संविधानाचा अपमान केलेल्या प्रतिनिधींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा...सचिन मोरे                                       बारामती:- आज बारामती येथे भाजपा अनु.जाती मोर्चा तर्फे प्रशासकीय भवन मध्ये तहसीलदार यांना भारतीय संविधान पायाजवळ ठेवून संविधानाचा अपमान केलेल्याचा जाहीर निषेध करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले.इंदापूर तालुक्यात तालुका येथील विद्युत वितरण विभागाच्या कार्यक्रमात दिनांक 14/09/2021 रोजी भारतीय संविधानाचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात आला व पायाजवळ ठेवून संविधानाची अवहेलना करण्यात आली याचा आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाति मोर्चा पुणे ग्रामीण यांच्या वतीने जाहीर निषेध करतो व त्या प्रतिनिधी वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करतो नियोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राज्‍यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी सदर कार्यक्रम मध्ये त्यांना भेट दिलेल्या सविधान प्रतीचा अनादर करण्यात आला अश्या महा विकास आघाडीच्या सरकारमधील नेते फुले शाहू आंबेडकर यांची नावे घेऊन पुरोगामी असल्याचा खोटा दावा करणाऱ्या या महा विकास आघाडी सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा पुणे ग्रामीणच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहोत.यावेळी अक्षय गायकवाड,सचिन मोरे,संजयजी(नाना)दराडे,संतोषजी कांबळे, स्वप्नील लोंढे ,शैलेश खरात, अभिजित पवार, उपस्थित होते.श्री. सचिन मोरे सोशल मीडिया जिल्हासंयोजक अनु.जाती मोर्चा भाजपा पुणे जिल्हा यांच्या पत्राद्वारे निवेदन देण्यात आले.

No comments:

Post a Comment