सराईत धोकादायक दोन गुन्हेगार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने केली तडीपार.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, September 14, 2021

सराईत धोकादायक दोन गुन्हेगार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने केली तडीपार..

सराईत धोकादायक दोन गुन्हेगार वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनने केली तडीपार..                                                                    वडगाव निंबाळकर:- सराईत धोकादायक अशा 2 गुन्हेगारांना एक वर्षासाठी पुणे, सातारा, सोलापुर, अहमदनगर जिल्हयातुन तडीपार, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचा तडीपार प्रस्तावास मंजुरी,वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हृददीतील सराईत आरोपी नामे गणेश सत्यवान गायकवाड व रविंद्र सुदाम गायकवाड दोघेही रा.चोपडज ता.बारामती जि.पुणे या दोन सराईत गुन्हेगार यांचे विरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मध्ये बेकायदा लोकांची गर्दी जमविणे, मारहाणीसह खुनाचा प्रयत्न, अनाधिकराने घरात प्रवेश करुन जबर मारहाण करुन जखमी करणे तसेच शिविगाळ व दमदाटी करणे अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल झालेले होते. भविष्यात देखील सदर आरोपी काहीएक कामघंदा न करता त्यांचे साथीदारासह दारु पिवुन मौजे चोपडज गावातील गोरगरीब लोकांना विनाकारण त्रास देणे, तसेच अनेक गुन्हयामंध्ये या दोन सराईत गुन्हेगारांना अटक झालेली आहे, तसेच त्यांचे वर्त् णुकीमध्ये बदल होवुन सुधारणा व्हावी याकरीता प्रतिबंधात्मक कारवाई देखील करणेत आलेली होती. परंतु त्यांचे वर्तुणूकीमध्ये सुधारणा न झालेने व भविष्यात देखील सराईत आरोपी नामे गणेश सत्यवान गायकवाड व रविंद्र सुदाम गायकवाड दोघेही रा.चोपडज ता.
बारामती जि.पुणे या दोन गुन्हेगारांचे हातुन मौजे चोपडज ता बारामती जि.पुणे या गावातील तसेच परीसरातील नागरीकांच्या जिवीतास तसेच मालमत्तेस धोका या सारखे गंभीर गुन्हे घडणेची दाट शक्यता निर्माण झाले कारणाने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि. सोमनाथ लांडे यांनी सदर आरोपींच्या
धोकादायक कृत्तीस प्रतिबंध व्हावा व समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी सदर आरोपींना मुंबई पोलीस कायदा १९५१ चे कलम ५६ ( ब ) प्रमाणे हृदद्पार करणेसाठी मा.श्री.नारायण शिरगावकर सो.उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग,पुणे ग्रामीण यांचे मार्फतीने मा श्री. दादासाहेब कांबळे,उपविभागीय दंडाधिकारी बारामती-इंदापुर उपविभाग, बारामती यांचे कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणेत आलेला होता.सदर प्रस्तावावर मा.उपविभागीय दंडाधिकारी बारामती- इंदापुर उपविभाग बारामती यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यांनी सादर केलेला प्रस्ताव, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, यांचा अभिप्राय व नियोजित हृदद्पार इसम यांचे लेखी म्हणणे व तोंडी युक्तीवाद ऐकुन त्यातील निष्कर्षामध्ये विवेचन केलेल्या कारणांचा विचार करुन मा.श्री.दादासाहेब कांबळे उपविभागीय दंडाधिकारी बारामती-इंदापुर उपविभाग, बारामती यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५९ चे कलम ५६ अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ ( १ ) ( अ) ( ब ) प्रमाणे सराईत आरोपी नामे गणेश सत्यवान गायकवाड व रविंद्र सुदाम गायकवाड दोघेही रा.चोपडज ता बारामती जि.पुणे या दोन गुन्हेगारांना पुणे जिल्हयातील बारामती-इंदापुर तालुक्यान्या सरहददीतुन दिनांक १३/०९/ २०२१ रोजीपासुन पुणे,सातारा,सोलापुर,अहगदनगर जिल्हयाचे कार्यक्षेत्राचे स्थळसिमेमध्ये १ वर्षासाठी प्रवेश न करणेबाबत पुन्हा न परतणे बाबत आदेश दिलेला आहे.किंवा सदरची कामगिरी ही मा.श्री. अभिनव देशमुख ,मा पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, मा.श्री. मिलिंद
मोहीते , अपर पोलीस अधिक्षक  बारामती, मा.श्री.नारायण शिरगावकर सो . उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी सपोनि श्री.सोमनाथ लांडे यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment