सिंहगडावर गाईड आणि इ-व्हेईकल सुरू करण्याबाबत विचार खा. सुळे यांच्या प्रस्तावावर अजित पवार यांचे सकारात्मक आश्वासन* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 17, 2021

सिंहगडावर गाईड आणि इ-व्हेईकल सुरू करण्याबाबत विचार खा. सुळे यांच्या प्रस्तावावर अजित पवार यांचे सकारात्मक आश्वासन*

*सिंहगडावर गाईड आणि इ-व्हेईकल सुरू करण्याबाबत विचार खा. सुळे यांच्या प्रस्तावावर अजित पवार यांचे सकारात्मक आश्वासन*
पुणे, दि. १७ (प्रतिनिधी) - सिंहगडावर इ-व्हेइकलचा वापर करणे, स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण देऊन 'गाइड' म्हणून रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, गडावरील ऐतिहासिक ठिकाणांची माहिती देणारे फलक उभारणे, स्वच्छता मोहिम राबवणे यासह  परिसरातील वनसंपदेत आणखी भर घालणे, आदी विषयांवर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकामंत्री अजित पवार यांच्यासोबात झालेल्या बैठकीत चर्चा केली.
खासदार सुप्रिया सुळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, माजी उपमहापौर दिलीप बराटे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, नगरसेवक सचिन दोडके,  राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदार संघ ग्रामीणचे अध्यक्ष त्र्यंबक मोकाशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक राहूल पाटील, नवनाथ पारगे यांच्यासह अधिकारी आणि पदाधिकारी या बैठकीला उपास्थित होते. 
 गेल्या आठवड्यात सुप्रिया सुळे यांनी सिंहगडाला भेट दिली होती. त्यावेळी गडासाठी काय करता येईल, नव्याने काही उपक्रम राबवता येतील का याबाबत त्यांनी गड परिसरातील नागरिकांशी चर्चा केली होती. त्यानुसार त्यांनी आज पालकमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काही उवक्रम राबवता येतील, असा प्रस्ताव मांडला. त्याला पवार यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे. हा किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून येथे विविध सोयीसुविधा करणे आवश्यक आहे. त्यासाठी जीर्ण झालेल्या इमारतींची पुनर्रचना करण्यासह पर्यटकांची सोय लक्षात घेऊन विविध उपाययोजना करणे आणि वाहतूकीची कोंडी टाळण्यासाठी येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे या बाबी सुळे यांनी अजित पवार यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यानुसार सिंहगड किल्ला व पर्यटन विकासाच्या दृष्टीने या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गडावर प्रदूषण होऊ नये यासाठी इ-व्हेईकलचा वापर करणे, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा अवगत असलेल्या स्थानिक नागरिकांना गाईड म्हणून नेमणूक केल्यास त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे सुळे यांनी सांगितले. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment