रागिणी फाऊंडेशन व आयोजित गौरी आरास स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 1, 2021

रागिणी फाऊंडेशन व आयोजित गौरी आरास स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..!

रागिणी फाऊंडेशन व आयोजित गौरी आरास स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न..!

बारामती:- येथील रागिणी फाऊंडेशन च्या वतीने गणेश उत्सवा निमित्त ऑनलाइन गौरी आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेमध्ये पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून महिलांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरिता
        'माझी इको-फ्रेंडली गौराई' याविषयावर आधारित आरास करायची होती. ' निसर्ग संवर्धन होऊन, प्लास्टिकमुक्ती व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर करणे किती गरजेचे आहे, याचे महत्त्व लक्षात घेऊन यावर्षी स्पर्धेचा विषय 'माझी इको-फ्रेंडली गौराई' असा देण्यात आल्याचे रागिणी फाऊंडेशनच्या अध्यक्षा राजश्री आगम यांनी सांगितले.
  सहभागी महिलांमधून अनुक्रमे -
प्रथम क्रमांक - सौ.शुभांगी  पवार,माळेगाव
 द्वितीय क्रमांक कु.अमृता तंटक,सिद्धेश्वर कुरोली तृतीय क्रमांक- सौ.स्वाती सस्ते,माळेगाव उत्तेजनार्थ क्रमांक- सौ.पुनम रणदिवे, फलटण उत्तेजनार्थ क्रमांक-सौ.वंदना तोडकर,मंगळवेढा विशेष आकर्षण- सौ. राजश्री धुमाळ, सुपे
विशेष आकर्षण - सौ.अंजली गोडसे,सातारा
 असे क्रमांक देण्यात आले.
      स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे विषयाची मांडणी, आशय,सादरीकरण, रंगसंगती, युट्युब वरील लाईक शेअर्स कमेंट्स याआधारे गुणांकन केले गेले, स्पर्धेसाठी परीक्षणाचे काम सौ रेखा आळंदकर व डॉ.हिमगौरी वडगावकर यांनी पाहिले.
       स्पर्धेचे बक्षीस वितरण सौभाग्य होलसेल साडी डेपो चे संचालक राहुल चव्हाण,अशोकराव चव्हाण ,श्री आप्पासाहेब भोसले, मंगेश एजगर अनिता शितोळे, राजश्री आगम,सौ नंदा भोसले ,सौ अस्मिता कोकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल कोकरे, राहुल चव्हाण,संतोष बांदल, विवेक भोसले, प्रकाश शिंदे, पूजा बोराटे, सुजाता लोंढे यांचे सहकार्य लाभले.ह्या कार्यक्रमासाठी सौभाग्य होलसेल साडी डेपो, सई फर्माकेम व युनिटेक कॉम्प्युटर यांचे प्रायोजकत्व लाभले.हा कार्यक्रम सौभाग्य होलसेल साडी डेपो येथे संपन्न झाला.

No comments:

Post a Comment