*वंचित बहुजन आघाडीच्या बारामती शहर/तालुक्यातील सर्व आजी/माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मिटिंग संपन्न*
बारामती:- वंचित बहुजन आघाडीच्या बारामती शहर/तालुका आजी माजी कार्यकर्त्यांची येत्या काही दिवसांवर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद च्या निवडणुका येऊन ठेपलेल्या असल्याने त्याबाबत आढावा आणि नियोजनासाठी तसेच रविवारी घेण्यात येत असलेल्या भव्य पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाबाबत नियोजन करण्यासाठी बारामती येथे मिटिंगचे आयोजन केले होते त्यामध्ये पक्ष बांधणी, आगामी निवडणुका, तसेच नवीन कार्यकर्त्यांचे भव्य पक्ष प्रवेश घेणे बाबत दिनांक 24/10/2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाध्यक्ष विनोदजी भालेराव यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्याचे ठरले त्यावेळी पुणे जिल्हामहासचिव मंगलदास निकाळजे, जिल्हाउपाध्यक्ष ऍड. वैभव काळे, शहराध्यक्ष अक्षय शेलार, ऍड. रियाज खान, विवेक बेडके, मयूर कांबळे, रोहित भोसले, रोहित पिल्ले, आण्णा घोडके, प्रज्वल भोसले, जितेंद्र कवडे, आकाश लांडगे, कृष्णा साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment