फेरेरो इंडिया च्या वतीने कटफळ मध्ये वृक्षारोपन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Tuesday, October 19, 2021

फेरेरो इंडिया च्या वतीने कटफळ मध्ये वृक्षारोपन

फेरेरो इंडिया च्या वतीने कटफळ मध्ये वृक्षारोपन 

बारामती:   बारामती एमआयडीसी मधील फेरेरो इंडिया प्रा ली यांच्या वतीने सोमवार 18 ऑक्टोबर रोजी' कटफळ' मध्ये  वृषारोपन करण्यात आले.या प्रसंगी फेरेरो इंडिया कंपनी चे प्लांट हेड डॅनियल पेरोटिनो ,एच आर मॅनेजर उमेश दुगानी,व कटफळ च्या सरपंच पूनम कांबळे,डॉ संजय मोकाशी,भारत मोकाशी,राजेंद्र मदने,मोहन मोकाशी,सुरेश कांबळे व कंपनीचे इतर अधिकारी,कर्मचारी उपस्तीत होते.
फेरेरो  इंडिया सामाजिक व पर्यावरण पूरक कार्यासाठी नेहमी अग्रेसर असते  कंपनी च्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी वृषारोपन करताना जास्त सावली देणारे, जमिनीत पाण्याची पातळी कायम राखणारे,पक्ष्यांच्या निवासस्थान साठी योग्य असणारे व ऑक्सिजन जास्त देणारे देशी वृक्ष पिंपळ,चिकू,आवळा,चिंच,आंबा आदी  चे  रोपटे लावून वृषारोपन करीत आहोत व हरित व पर्यावरण पूरक  बारामती साठी योगदान देत असल्याचे प्लांट हेड डॅनियल पेरोटीनो यांनी सांगितले.कंपनी दरवर्षी वृषारोपन बरोबर   वृक्ष मोठे होई पर्यंत पाणी,खत,ट्री गार्ड च पुरवठा करते फेरेरो इंडिया मुळे कटफळ च्या पर्यावरण वैभवात भर पडत असल्याचे सरपंच पूनम कांबळे यांनी सांगितले. कटफळ ग्रामपंच्यात च्या वतीने कंपनी प्रशासन चे आभार मानण्यात आले.


No comments:

Post a Comment