पर्यायी स्मशानभूमीचे बांधकाम करावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा... बारामती:- जळोची गावातील स्मशानभूमीत गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार केले जातात, त्या मुळे जळोची गावातील इतर आजाराने किंवा नैसर्गिक मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कार करणे कामी खुप अडचणी निर्माण होतात शेती वाडी मधे उघड्यावरती अंत्यसंस्कार केले जातात, प्रेताला अग्नी दिल्या नंतर मधेच पाऊस आला तर अर्धवट प्रेत जळत असुन त्याची विटंबना होत आहे, त्यामुळे जळोची साठी कोरोना विरहित पर्यायी स्मशानभूमी बांधावी या साठी प्रशासनाच्या वेळो वेळी पाठपुरावा करून ही बाबा लक्षात आणुन दिलेली असतांना जाणूनबुजून या गोष्टीं कडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे आज बारामती नगरपरिषद चे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर पर्यायी स्मशानभूमीचे बांधकाम करावे असे सुचित करण्यात आले आहे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला त्या वेळेस तालुक अध्यक्ष अँड अमोल सातकर, रेवण कोकरे, निखील दांगडे, चंद्रकांत वाघमोडे, डॉ.नवनाथ मलगुंडे, किशोर सातकर आदी उपस्थित होते...
Post Top Ad
Wednesday, October 20, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
पर्यायी स्मशानभूमीचे बांधकाम करावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा...
पर्यायी स्मशानभूमीचे बांधकाम करावे अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment