कोयत्याने स्वताचे मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी ३ तासाचे आत अटक..बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 23, 2021

कोयत्याने स्वताचे मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी ३ तासाचे आत अटक..बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी..!

कोयत्याने स्वताचे मुलाचा खुन करुन पसार झालेला आरोपी ३ तासाचे आत अटक..बारामती तालुका पोलीस स्टेशन गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी..!
बारामती:- दि २३/१०/२०२१ रोजी मा.पोलीस निरीक्षक ढवाण सो यांना पारवड़ी गावचे पोलीस पाटील यांनी फोनव्दारे कळवले की पारवडी गावचे हददीत शिपकुले वस्ती येथे कातकरी
समाजाचे एका इसमाने स्वताचे मुलाचा कोयत्याने डोक्यात वार करुन खुन केला आहे सदर ची बातमी मिळताच पोलीस निरीक्षक ढवाण पोलीस स्टाफ घेवुन घटना स्थळावर रवाना झाले त्याठिकाणी पोहचले असता त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी नामे मारुती साधुराम जाधव हा कातकरी समाजाचा माणुस मजुरी साठी पारवडी गावचे हददीत आला असुन. त्याने त्याचा सावत्र मुलगा गोपीनाथ मारुती जाधव याची घरगुती कारणावरुन भांडण झाले होते त्यारागात मारुती जाधव याने स्वताचे मुलाच्या डोक्यात लोखडी धातुचे कोयत्याने डोक्यात व मानेवर वार करून खुन करुन पसार झाला आहे.त्यानंतर सदर आरोपी अटक करण्यासाठी गुन्हेशोध पथकाला सुचना देवुन आरोपी अटक करण्यासाठी सुचना दिल्या. परंतु सदर आरोपी अटक करणे पोलीसासाठी खुप कठीण काम होते कारण सदर आरोपी हा अदिवाशी समाजाचा असल्यामुळे तो मोबाईल वापर करीत नव्हता.तसेच त्याचे कोणी नातेवाईक वगैरे नसल्याने व सदर आरोपीची कोणतीही ओळख फोटो उपलब्ध नसलेने सदर आरोपी अटक करणे जिकीरीचे काम होते. गुन्हेशोध पथकाने पोलीस निरीक्षक मा ढवाण याचे सुचना प्रमाणे घटना स्थळापासुनचा
वनविभागाचा १० ते १५ कि मी चा टप्पा पायी सर्च करुन वनविभागातील झाडीत लपलेला आरोपीस गुन्हेचे कामी अवघ्या ३ तासात ताब्यात घेतले पुढील कार्यवाही पोलीस निरीक्षक ढवाण करीत आहेत सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे,विनोद लोखंडे, यांनी केली आहे.अशी माहिती महेश ढवाण पोलीस निरीक्षक
बारामती तालुका पोलीस ठाणे यांनी दिली.

No comments:

Post a Comment