बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश मेळावा संपन्न* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, October 25, 2021

बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश मेळावा संपन्न*

*बारामतीत वंचित बहुजन आघाडीचा पक्ष प्रवेश मेळावा संपन्न*

बारामती : बारामती येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पक्ष प्रवेश व आगामी निवडणुकांच्या संदर्भात पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी भव्य पक्ष प्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते बारामती तालुक्यातील बऱ्याच युवक व युवतीनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पुणे जिल्हाध्यक्ष विनोदजी भालेराव तसेच महिला जिल्हाध्यक्षा  सीमाताई भालेसेन यांच्या उपस्तितीत जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामध्ये जिल्हाध्यक्ष विनोदजी भालेराव यांनी येणाऱ्या पुणे जिल्ह्यातील निवडणुका स्वबळावर व पूर्ण ताकतीने लढणार असल्याचे सांगितले तसेच कार्यकर्त्यांच्या माठीमागे ठामपणे उभा राहणार असल्याचे सांगितले तसेच महिला जिल्हाध्यक्षा सीमाताई भालेसेन यांनी महिलांचे प्रश्न मांडून महिलांचे संघटन मोठ्या ताकतीने करणार असल्याचे सांगितले व आयोजकांचे कौतुक केले, पुणे जिल्हा महासचिव मंगलदास भाऊ निकाळजे यांनी येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका या सर्व निवडणुकामध्ये पक्ष बांधणी करुन वरिष्ठांच्या सूचनेनुसार उमेदवार उभे करणार असल्याचे सांगितले तसेच जिल्हाउपाध्यक्ष ऍड वैभव काळे, जिल्हा महासचिव निलेश वामणे, ऍड.रियाज खान यांनी देखील आपले मत मांडले.
पक्ष प्रवेशामध्ये बारामती शहरातील इतर पक्षातील व विविध संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला त्या मध्ये रोहित पिल्ले, जितेंद्र कवडे, सिद्धार्थ पवार, ऍड. तुषार ओव्हाळ, प्रशांत सरतापे,योगेश आढाव, सोहेल सैय्यद,अण्णा घोडके, अनिल जगताप,सुरज गव्हाळे, विक्रम थोरात, अमोल धेंडे, मोहन कांबळे, अमोल जगताप, सागर शेलार या प्रमुख कार्यकर्त्यांसह त्यांच्या इतर साथीदारांनी जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश करत पक्ष देईल ती पुढील जबाबदारी मोठ्या ताकतीने पार पाडत पक्ष संघटन मजबूत करण्याचा संकल्प व ग्वाही जिल्हाध्यक्ष याना सर्व कार्यकर्त्यांनी दिली. सदरील कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मा. शहर अध्यक्ष अक्षय शेलार यांनी मानले. ह्या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सदस्या निर्मला वनशिव, पुणे जिल्हा महिला महासचिव प्रियांका ताई लोंढे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मालती ताई बडेकर, जिल्हा महासचिव प्रशांती ताई साळवे, ज्येष्ठ कार्यकर्त्या उषा ताई वाघमारे, जिल्हा सल्लागार धिरज कांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय गायकवाड, हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा महासचिव मंगलदास भाऊ निकाळजे,जिल्हा उपाअध्यक्ष ऍड. वैभव काळे, मा. शहर अध्यक्ष अक्षय शेलार, मयूर कांबळे, रोहित भोसले, विनय दामोदरे, मोहन कांबळे,ऍड. रियाज खान आदी कार्यक्रत्यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment