बारामतीत कोणकोणते व्यापारी घेतायेत रेशनिंगचे काळ्या बाजाराचे गहू तांदूळ...! बारामती:-- सद्या बारामती व तालुक्यात रेशनिंगचा काळा बाजार सुरू असून दुकानदारांचे टोळी तयार होत असून आपल्या दुकानातल्या राहिलेल्या (काटा मारून)गहू तांदूळ काळ्या बाजारात विकण्याचा सपाटा चालू असून याला आळा बसणे गरजेचं झाले आहे असे मत नागरिकांनी बोलून दाखविले,एका गावात तर चक्क 97 लाभार्थी यांनी धान्य घेतले असल्याचे रेकोर्ड असून मात्र ते लाभार्थी अस्तित्वातच नसल्याचे कळतंय, तर पाच दहा दुकानदारांची टोळी करून बारामती शहर व तालुक्यामधील काही व्यापाऱ्यांना गहू तांदूळ काळ्या बाजारात विकण्याचा धंदा चालू असल्याचे कळतंय, याबाबत पुरावे असून ते लवकरच जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना देणार असल्याचे समजले, कोरोनाचा काळ असताना अशी किती धान्याची लूट केली गेली तर किती लोकांचे काटे मारून मापात घट करून धान्य साठविले गेले, याबाबत कधी अधिकारी यांनी चौकशी अथवा प्रामाणिक तपासणी करून दुकांदारावर कडक कारवाई केली का?परंतु असं दिसून येत नसल्याने नागरिक तहसील कार्यालयात तक्रारी करू लागलेत पण दुकांदारावर कारवाई होत नसल्याने यामध्ये संशय येत असल्याचे दिसत आहे,यामध्ये आर्थिक उलाढाल होत असल्याचे समजते.तर दुसरीकडे असे व्यापारी जे गोरगरिबांचे धान्य काळाबाजारात घेऊन या स्वस्त धान्य दुकानदाराला गब्बरगंड करीत आहे.
Post Top Ad
Tuesday, October 26, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामतीत कोणकोणते व्यापारी घेतायेत रेशनिंगचे काळ्या बाजाराचे गहू तांदूळ...!
बारामतीत कोणकोणते व्यापारी घेतायेत रेशनिंगचे काळ्या बाजाराचे गहू तांदूळ...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment