बारामती मध्ये रस्त्याच्या कामाची सुरुवात लगबगीने..ही कामे निकृष्ट की उत्कृष्ट चर्चेला उधाण. बारामती:- सार्वजनिक बांधकाम विभाग व बारामती नगरपरिषदे मार्फत बारामती शहर व बारामती तालुक्यातील रस्त्याच्या कामाची सुरवात लगबगीने करण्यात आली मात्र ही कामे निकृष्ट की उत्कृष्ट होतात हे येणाऱ्या काही महिन्यातच दिसून येईलच परंतु शाखा अभियंता किती वेळा या कामावर विझिट देतात हे तपासणे गरजेचे आहे, ऑफिस फक्त नावालाच असून या ऑफिसमध्ये कमी तर साईटवर जास्त असं भासविले जाते, येथे येणारा नागरिक मात्र हेलपाटे मारत असतो पण अधिकारी भेटत नसल्याचे सांगितले गेले.अश्या कितीतरी चालू असणाऱ्या रस्त्याच्या डागडुजीच्या कामात डांबर कमी प्रमाणात वापरलेचे दिसत असून याची कल्पना वरीष्ठ अधिकारी यांना देण्यात आली आहे, ठेकेदार मात्र कामे निकृष्ट दर्जाची करून आपले बिल काढून मोकळा होतो पण त्रास मात्र नागरिकांना भोगावा लागतो ते काही महिन्यातच पडलेले रस्त्याच्या खड्ड्यामुळे,डांबर कमी प्रमाणात वापरल्याने खडी निघून जाते व खड्डे पडले जातात हे कायम पहावयास मिळते दरम्यान अश्या ठेकेदाराला पुन्हा पुन्हा कामे दिलीच कशी जातात हे न उलगडणारे कोडे आहे कदाचित आर्थिक देवाण घेवाण करून त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार तर नाहीना अशी प्रतिक्रिया नागरिकांनी बोलून दाखवली.अश्या चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत घालणार का असा सवाल करण्यात येत आहे.
Post Top Ad
Thursday, October 28, 2021
Home
ताज्या घडामोडी
बारामती
बारामती मध्ये रस्त्याच्या कामाची सुरुवात लगबगीने..ही कामे निकृष्ट की उत्कृष्ट चर्चेला उधाण.
बारामती मध्ये रस्त्याच्या कामाची सुरुवात लगबगीने..ही कामे निकृष्ट की उत्कृष्ट चर्चेला उधाण.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment