सावकारावर मोक्का अंतर्गत कारवाई होणार म्हणूनच हनी ट्रॅप मध्ये अडकविण्याचा केला का प्रयत्न? चर्चेला उधाण..तो सावकार व त्याला सहकार्य करणारे कोण?..
बारामती(संतोष जाधव):- नुकताच काही बातम्यामुळे पुणे जिल्हा पोलीस दलातील एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष वरिष्ठ अधिकार्याला जाणीवपूर्वक गुंतवण्यात आले असल्याच्या चर्चेला उधाण आले असून,एका खाजगी सावकाराने त्याच्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी व त्या प्रामाणिक अधिकार्याला बदनाम करण्यासाठी व ब्लॅकमेलिंग करण्याच्या
हेतूने एका मुलीला पूढे घालत हा प्रकार केला असल्याच्या चर्चेला उधाण आल्याचे बारामती व परिसरात दिसत असून आता जाणीवपूर्वक बदनाम केलेल्या अधिकार्यामुळे पोलीस दलाची ही मोठ्या प्रमाणावर बदनामी झाली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी या सावकारांवर काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून बारामतीकर वाट पाहत आहे, त्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कामावर रुजू झाल्यापासून अगदी प्रामाणिक पणे काम केले असल्याचे कळते,अवैधरित्या चालणार्या सावकारांवर गुन्हा दाखल करत,सावकारकी करणार्यांचे कंबरडे
मोडले होते,आणि गोरगरिबांना सावकारी पाशातून मुक्त करण्याचे काम ह्या धडाकेबाज अधिकाऱ्यानेच केलं.यामुळे अनेक गोरगरिबांना त्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्या,त्यामुळे ह्या अधिकार्याचा मोठा आधार मिळत होता,आता मात्र गोरगरिबांची कदर करणारा पुन्हा होईल का?ही चिंता व्यक्त होताना दिसत आहे, जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आले आहे,अशी चर्चा देखील सुरू आहे,यामुळे आता वरिष्ठांनी या प्रकरणात लक्ष घालून एका कर्तव्यदक्ष अधिकार्याला ह्या बदनामीच्या कलंकातून मुक्त करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.तसेच या प्रामाणिक गोरगरिबांची कदर करणाऱ्याला ज्या सावकाराने जाणीवपूर्वक बदनाम करण्याच्या हेतुने हा घाट घातला असावा,
यामुळे आता या सावकारावर पोलीस प्रशासन मोक्का अंतर्गत कारवाई करणार का? त्याच्या अशा घातक कृत्यामुळे जी पोलीस अधिकार्याची होणारी बदनामी व पोलीस दलावर
संशयाची सुई निर्माण करणार्या घातकी सावकारांवर आता वरिष्ठांनी मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.जर कारवाई नाही झाली तर अशा मोकाट सुटलेल्या सावकारांची मजल आणखी वाढेल अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे..लवकरच या सावकाराची पोलखोल करणार असून,या सावकाराला उघडा पाडत प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांसाठी सामाजिक संघटना व पत्रकार बांधव जोरदार प्रयत्न करणार असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment