*कृषी पदवीधर संघटना च्या वतीने कृषीश्री अंकुश रा टेंभरे यांना विदर्भातुन उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार *
पुणे:- येथे कृषी पदवीधर संघटनेचा वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार सोहळा दि १८/१०/२०२१ रोजी पार पडला त्यामध्ये कृषी कार्यात उत्तम कामगिरी केल्याबद्दल विदर्भातून यवतमाळ जिल्ह्यातील कृषीश्री अंकुश राजेश टेंभरे ह्यांना उत्कृष्ठ स्वयंसेवकाचे सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र डी वाय एस पी श्री सविता गर्जे मॅडम आणि संघटनेच्या आईसाहेब अध्यक्षा मा श्रीमती मंगला कडून पाटील ह्यांच्या हस्ते देण्यात आला.या कार्यक्रमास मंत्रालयाचे माझी कृषी वरीष्ठ अधिकारी श्री गुजर साहेब, रॉयल ऍग्रो सोसायटी चे संस्थापक श्री अनिकेत देशमुख, विदर्भाचे विद्यार्थी मुख्य समन्वयक श्री उदय गर्जे सर,व इतर मान्यवरांच्या समक्ष हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
No comments:
Post a Comment