*महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 1, 2021

*महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

*महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन*

मुंबई, दि. 2 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचारांचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं आहे. 
उपमुख्यमंत्री अजित पवार महात्मा गांधीजींना आदरांजली म्हणाले की, गांधीजींनी देशाला सत्याग्रह, अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवून दिलं. समाजातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या हक्कांचा लढा लढला. मानवतेच्या कल्याणात विश्वाचं कल्याण आहे ही शिकवण दिली. खेडी स्वयंपूर्ण झाली तरंच देश स्वयंपूर्ण होईल हा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधीजी ही केवळ व्यक्ती नसून मानवकल्याणाचा, विश्वकल्याणाचा विचार असून तो अमर आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त  अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

माजी पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शास्त्रीजींनी देशाला 'जय जवान जय किसान'चा नारा दिला. त्या नाऱ्याची आजही गरज असून तोच नारा देशाला बलशाली बनवेल. शास्त्रीजींना देशातल्या शेतकरी, सैनिकांबद्दल कणव होती. ते सामान्य माणसाचं दु:ख जाणणारे पंतप्रधान होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन ते पंतप्रधानपदापर्यंत पोहचले होते.  पंतप्रधान झाले तरी जीवनाखेरपर्यंत त्यांची राहणी साधी राहीली. देशवासियांसाठी मृदू असलेले शास्त्रीजी देशाच्या शत्रूंसाठी वज्राहून कठोर होते. देशाचे कणखर पंतप्रधान म्हणून त्यांचं जीवन युवकांना, भावी पिढीला सदैव प्रेरणा देईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबहादूर शास्त्री यांचे स्मरण करुन त्यांनाही जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

No comments:

Post a Comment