बारामतीत किरीट सोमय्या चा घणाघात..अजित पवारांनी 'जरांडेश्वर'च्या मालकाचे नाव घोषित करावे...
बारामती : नुकताच बारामतीत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी बारामती तालुक्यातील सांगवी या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचे स्वागत स्वीकारले तर बारामती शहरात तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केल्यानंतर भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत पवार परिवारावर गंभीर आरोप करत हनुमानाच्या शेपटी प्रमाणे जरांडेश्वरच्या मालकाची यादीच वाढत आहे.अजित पवारांनी या कारखान्याच्या मालकाचे नाव घोषित करावे.चालक कोण आहे हे जगाला माहिती आहे.पवार परिवाराने बेनामी कारखाने पदाचा गैरवापर करुन घेतल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. बारामती येथील भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, जरांडेश्वर शुगर मिल्स प्रा. लि. कंपनी कोणाची, अजित
पवारांनी मालकाचे नाव घोषीत करावे. हा कारखाना विकत घेण्यासाठी त्यांनी बेनामी पद्धत का वापरली, गुरु कोमोडिटी सर्व्हीसेस ला अजित पवार यांनी साखर कारखाना घेण्यासाठी 65 कोटी रुपये मागील दाराने दिल्याचा आरोप सोमय्या यांनी यावेळी केला.पवार परिवाराने जाब द्यावा सोमय्या पुढे म्हणाले, या सगळ्या बाबींचा तपास झाला पाहिजे. तसेच या सगळ्याचा जाब पवार परिवाराने द्यावा. ठाकरे सरकारचे 40 जण
समोर आले आहेत. आतापर्यंत 26 घोटाळ्यांची
तक्रार आपण केले आहे. यामध्ये राजकीय
पदाधिकारी आणि 4 अधिकार्यासह 16
जणांच्या तक्रारींचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली.पत्रकार परिषद झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला तदनंतर यावेळी त्यांनी विद्या प्रतिष्ठान च्या मागील बाजूस असणाऱ्या परिवहन अधिकारी खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी केली.यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे,बाळासाहेब तात्या गावडे, रंजन काका तावरे, अविनाश मोटे,दिलीप खैरे,गोविंद देवकाते,पांडुरंग कचरे, सतीश फाळके,संतोष जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment