"तु सैतानाचा अवतार आहे हिचा बळी द्या"असे म्हणत पीडित महिलेचा हाताने गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न...बारामती तालुक्यातील सोमेश्वर-करंजे येथील घटना. बारामती:- तालुक्यातील करंजे मधील महिलेला सैतानाचा अवतार आहे, असं म्हणत तिचा बळी द्या म्हणून गळा दाबून जीव घेण्याचा प्रयत्न
करणार्याविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तात्या नावाच्या मांत्रिकाने अघोरी कृत्य
करण्यासाठी विवस्त्र करून सासू व दीर यांनी लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या आरोपी महेंद्र माणिकराव गायकवाड,राजेंद्र माणिकराव गायकवाड, सासू व माणिकराव गायकवाड, ननंद नीता अनिल जाधव आणि अघोरी उपचार करणार्या मांत्रिकावर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. पीडित महिलेने याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीं हे छोटया छोट्या कारणावरून जाणून बुजून वाद घालण्याचा प्रत्यन करीत असून, दीर महेंद्र यांनी "तु सैतानाचा अवतार आहे हिचा बळी द्या"असे म्हणत पीडित महिलेचा हाताने गळा दाबून जीव
घेण्याचा प्रयत्न केला, नरबळी देण्याच्या हेतूने तात्या नावाच्या मांत्रिकाने अघोरी कृत्य करण्यासाठी पीडित महिलेला विवस्त्र करून अघोरी कृत्य करण्यासाठी भाग पाडले, तसेच सासू कौशल्या, दीर महेंद्र यांनी लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आपल्या सोबत घडलेल्या या प्रकारामुळे पीडित महिला घाबरलेली,
त्यामुळे पीडित महिलेने बारामती शहर पोलीस
ठाण्यात धाव घेतली. आपल्यासोबत घडलेल्या
घटनेबाबत पोलिसांना सांगत त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर महा नरबळी अधिमियम २०१३ कलम २(१) ख, भादवी कलम ४९८ (अ),
३०७,३५४,३२४,३२३, ५०४,५०६ (३४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस करीत आहेत.
No comments:
Post a Comment