शाब्बास..बारामतीत अन्न व औषध प्रशासन ने स्वीट दुकानावर कारवाई केली,दिवाळीत अजून किती ठिकाणी होणार कारवाई?
बारामती(संतोष जाधव):- बारामतीमधील हिंद स्वीट्स या भिगवण रस्त्यावरील दुकानात 50 किलो स्वीट दुकानात खवा आढळून आल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाने या दुकानावर कारवाई केली. तसेच खव्याचे नमुने जप्त करण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुपारी अन्न व औषध खात्याने ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राहुल खंडागळे यांनी या संदर्भात माहिती दिली. येथील हिंद स्वीट्स या दुकानावर खात्याच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी त्यांच्याकडे पामोलिन तेल,दूध पावडर व रंग या पदार्थापासून आरोग्यास अपायकारक असलेल्या खवा तयार करण्यात आल्याचे आढळून आले.50 किलो खवा येथे होता. हा खवा पुरवणाऱ्या पुरवठादारांची नावे निष्पन्न झाली असून हा खवा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या दुकानाचा परवाना नसल्याने हे बंद ठेवण्याचे आदेश दुकानदाराला दिले आहेत. या दुकानदाराने बाहेरून खवा
मागवला होता. त्यामुळे यामध्ये ज्यांच्याकडून या
पुरवठा झालेला पुरवठादारांवर कारवाई होईल. मात्र त्या संदर्भातील नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून खव्याच आहे, अशा त्याचा अहवाल येण्यास वीस दिवस लागतील असे खंडागळे यांनी सांगितले. दरम्यान या दुकानात उत्पादक म्हणून नव्हे, तर या दुकानाने हा खवा येथे विक्रीसाठी ठेवला होता.मात्र या दुकानाकडे अन्नपदार्थ विकण्याचा परवाना नसल्याने या दुकान बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे खंडागळे यांनी सांगितले.अशीच कसून तपासणी केल्यास नक्कीच बारामती मध्ये हॉटेल,स्वीट होम,मॉल, बझार याठिकाणी काहीतरी सापडेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment