मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यादगार सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबिर संपन्न.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, October 23, 2021

मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यादगार सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबिर संपन्न..

मा. खा. शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत यादगार सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबिर संपन्न...
बारामती:- यादगार सोशल फाऊंडेशन व बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती येथील ब्राम्हण सभागृह याठिकाणी मा.खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रीया शिबिर संपन्न झाला.सदर कार्यक्रमाकरीता संपुर्ण बारामती तालुक्यातून जवळ जवळ २६८ च्या वर
मोतिबिंदू असणारे रूग्ण व यादगार सोशल फाऊंडेशनच्या वतीने ७५२ नागरीकांची डोळे तपासणी करून चष्मे मोफत देण्यात आले व त्याचबरोबर बारामती शहरामध्ये कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीत जनसेवा केलेल्या ८ कोरोना योध्दा मंडळ यांचाही सत्कार मा.खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सदरवेळी मा.खा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांनी यादगार सोशल फाऊंडेशनहा नेहमीच समाजउपयोगी व लोकउपयोगी कामे करण्यास अग्रेसर असतो असे सांगून
फाऊंडेशनच्या या उपक्रमाचीही स्तुती केली व यापुढेही फाऊंडेशनच्या माध्यमातून अशीच
कामे करीत राहणेबाबत संबोधिले.सदर कार्यक्रमाचे वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.प्रदिपदादा गारटकर,बारामती नगरीच्या नगराध्यक्षा सौ. पोर्णिमाताई तावरे, मा.नगराध्यक्ष श्री. सदाशिव (बापू) सातव, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर, गटनेते श्री. सचिनशेठ सातव, जेष्ठ विधिज्ञ अॅड. ए.व्ही. प्रभुणे, डॉ.राजेंद्र मुथा, डॉ. राजेश कोकरे, नगरसेविका डॉ. सौ. सुहासिनीताई सातव, सौ. कमलताई कोकरे, माजी नगरसेक बाळासाहेब पाटील, अनिल कदम, सिध्दनाथ भोकरे, निलेश इंगुले, पाटील सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाकरीता माजी नगरसेवक अजीजभाई बागवान व विद्यमान नगरसेविका सौ. बेबीमरियम अजीजभाई बागवान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सदर कार्यक्रम यशस्वी होणेकरीता मा. फिरोज अजीजभाई बागवान,
माजी नगरसेवक अमजद अजीजभाई बागवान व यादगार सोशल फाऊंडेशनचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.अशी माहिती फिरोज हा.अजीजभाई बागवान यांनी दिली.

No comments:

Post a Comment