पालखी मार्ग मोबदल्यात नक्की चाललंय काय..? गोजूबावीत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे बारामती तालुक्यातील काम बंद पाडले..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, October 3, 2021

पालखी मार्ग मोबदल्यात नक्की चाललंय काय..? गोजूबावीत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे बारामती तालुक्यातील काम बंद पाडले..!

पालखी मार्ग मोबदल्यात नक्की चाललंय काय..? गोजूबावीत संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे बारामती तालुक्यातील काम बंद पाडले..! 
 बारामती:- बारामती मध्ये अनेक वेळा पालखी मार्ग मोबदल्यात काही राजकीय पक्षातील एजंट यांच्या माध्यमातून टक्केवारी घेत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले त्याबाबत वेळोवेळी उपविभागीय अधिकारी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली परंतु कोणताही फरक न पडणाऱ्या एजंटला या कार्यालयात सतत वावरताना दिसत आहे पण त्यांना समज कधी मिळेल हे येणारा काळच सांगेल अनेक वेळा हेलपाटे मारून झालेला शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आल्याचे पहावयास मिळत आहे तर नुकताच एक जनाने प्रशासन भवन येथील इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न देखील केला होता पण तेथील उपस्थित नागरिकांनी सावधानता बाळगल्याने मोठा अनर्थ टळला अश्या अनेक किस्से लवकरच प्रसिद्ध करणार आहे,पण आत्ता नुकताच संत तुकाराम महाराज पालखी राष्ट्रीय
महामार्गाच्या भूसंपादनात गावोगावी किस्से घडलेल्या आहेत. यापूर्वी भूसंपादनाच्या प्रक्रियेत असणार्यांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेताना काहींना पायघड्या तर काही शेतकर्यांचे हात कोरडे राहतील अशा क्लृप्त्या करून ठेवल्या आहेत. वासुंदे गावापासून ते सराटी गावापर्यंत असे बरेच किस्से घडलेले आहेत.त्यातील एक किस्सा आता गोजुबावीचा आहे.या गावाचा भूसंपादनाच्या मोबदल्याचा निवाडा दोन वेळा करण्यात आला आहे, त्यामध्ये दुसर्या वेळी करण्यात आलेला निवाडा हा पहिल्यावेळी जाहीर केलेल्या निवाड्यातील रकमेमध्ये जवळपास निम्म्याने घट आणणारा ठरल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.त्यांचा पालखी महामार्गाला विरोध नाही. शासनाच्या योजनांना तर अजिबातच नाही. फक्त काम सुरु होण्याअगोदर एक निवाडा आणि नंतर अगदी वर्षा-दिड वर्षाने दुसरा निवाडा केल्याबदद्ल त्यांच्या मनात कटुता आहे, एवढेच.. गोजुबावी व कटफळ या गावातील बाधित शेतक-यांना प्रति गुंठा चार लाख सहा हजार या प्रमाणे नुकसान भरपाईबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र पुन्हा शेतक-यांना नवीन नोटीस प्राप्त झाली असून निवाडा दुरुस्त करुन सदरची नोटीस आल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे.बाजारभावाच्या मूल्यापेक्षा कमी मूल्यांकन करुन नवीन नोटीस दिल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.बेकायदा दुरुस्त केलेला निवाडा रद्द करा, पूर्वीच्या निवाड्यानुसारच मोबदला द्यावा, मोबदला दिल्याशिवाय काम सुरु करु नये अशा मागण्या शेतक-यांनी केल्या
आहेत. या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर हे काम करु देणार नसल्याची भूमिका शेतक-यांनी घेतली आहे. याबाबत 29 सप्टेंबर रोजी अर्ज दिलेला असतानाही उपविभागीय अधिका-यांनी दडपशाही पध्दतीने काम सुरु ठेवल्याचाही आरोप करण्यात आला.अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment